Headlines

भन्नाट! आता IRCTC वर पैसे न देता तिकीट बुक करू शकतील Paytm युजर्स, पाहा पूर्ण प्रोसेस

[ad_1]

नवी दिल्ली: आजकाल अनेक जण पेमेंट करण्यासाठी Paytm चा वापर करतात. तुम्ही देखील जर पेटीएम युजर्स असाल तर एक आनंदाची बातमी आहे. आता Paytm युजर्स IRCTC द्वारे तिकीट बुक करू शकतात आणि नंतर पैसे देऊ शकतात. यासाठी पेटीएम पेमेंट गेटवे (Paytm PG) ने Buy Now Pay Later सेवा सुरू केली आहे. पेटीएमच्या या सेवेद्वारे तिकीट बुक करतानाच पेमेंट करणे आवश्यक नाही. पेटीएमने आपली पोस्टपेड सेवा IRCTC वर देखील सुरू केली आहे. सेवा पोस्टपेड युजर्सना IRCTC वरून त्वरित तिकिटे बुक करण्यास आणि नंतर पैसे देण्यास अनुमती देईल.

वाचा: म्युझिकची आवड असेल तर हेडफोन्ससह ‘हे’ गॅझेट्स देखील तुमच्याकडे असायलाच हवे, किंमत बजेटमध्ये, पाहा लिस्ट

Paytm पोस्टपेड आयआरसीटीसी युजर्ससाठी उपलब्ध असेल ज्यांनी ही तिकिटे बुक केली आहेत. Paytm पोस्टपेड युजर्सना ३० दिवसांसाठी ६०,००० रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त क्रेडिट देते. बिलिंग सायकलच्या शेवटी, युजर्सना संपूर्ण रक्कम भरावी लागेल. तसेच, युजर्स बिल EMI मध्ये Convert देखील करू शकतात. IRCTC तिकीट बुक करण्यासाठी पेटीएम पोस्टपेडचा वापर अगदी सहज करता येतो. यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये IRCTC चे अधिकृत पोर्टल किंवा अॅप उघडावे लागेल.

त्यानंतर तुम्ही तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेला पुढे जावे लागेल. ज्यामध्ये तुम्हाला प्रवासाची माहिती द्यावी लागेल. यानंतर, तुम्हाला तिकीट बुक करण्यासाठी पेमेंट पर्यायावर नेले जाईल. जिथे तुम्हाला Pay Later पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला पेटीएम पोस्टपेडचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या पेटीएम खात्याचे क्रेडेंशियल्स देऊन लॉग इन करावे लागेल. तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर OTP येईल. OTP देऊन तुम्ही पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुमचे रेल्वे तिकीट बुक केले जाईल.

वाचा: बहुप्रतीक्षित OnePlus 10 Pro ची भारतात एन्ट्री, स्मार्टफोन होणार मिनिटांत फुल चार्ज, पाहा किंमत

वाचा: EPFO: UAN मध्ये चुकीचे बँक अकाउंट? ‘असे’ करा बँक अपडेट, मिनिटांत होईल काम, फॉलो करा ‘ही’ सोप्पी प्रोसेस

वाचा: स्मार्टफोनला हॅकर्सच्या नजरेपासून सेफ ठेवायचे असल्यास ट्राय करा ‘या’ भन्नाट टिप्स, डिव्हाइस राहील कायम सुरक्षित

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *