Headlines

भल्याभल्या सुगरणींना जमलं नाही ते Ajinkya Rahane ने करून दाखवलं…

[ad_1]

मुंबई : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. कालपासून अनेकांच्या घरी सर्वांचे लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह 10 दिवस असतो. या दरम्यान घराघरात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. यामधील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मोदक.

अनेकांचे आवडते मोदक खायला सर्वांना आवडतात. मात्र बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे मोदक करण्यासाठी फार थोडे अवघड असतात. भल्याभल्यांना उकडीचे मोदक बनवणं कठीण होतं. मात्र याला अपवाद ठरलाय टीम इंडियाचा स्टार मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे.

भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीयोमध्ये अजिंक्य रहाणे उकडीचा मोदक बनवताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने लिहिलं आहे की, हा माझा #GaneshChaturthi चा सर्वात आवडता भाग आहे.

दुखापतीमुळे रहाणे टीम इंडियातून बाहेर

यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाज अजिंक्य रहाणेला नव्या टीमची साथ मिळाली आणि ती नवी टीम म्हणजे KKR. या टीमने रहाणेला 1 कोटींच्या मूळ किमतीत खरेदी केलं. पण लीगमध्येच तो जखमी झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता पुन्हा एकदा तो मैदानावर उतरणार आहे

रहाणेकडे पुन्हा कर्णधारपद

अजिंक्य रहाणे येत्या काही दिवसांत भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. पश्चिम विभागाच्या टीममध्ये मुंबईतील नऊ खेळाडूंची निवड झाली आहे.

विभागीय निवड समितीने मुंबईचे आघाडीचे फलंदाज पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, शम्स मुलाणी आणि सुवाद पारकर यांची निवड केलीये. त्याचवेळी रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरनेही संघात स्थान मिळवले. 

भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील क्षेत्रीय निवड समितीने दुलीप करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय स्टार-स्टर्ड टीममध्ये श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांची निवड केली आहे आणि टीमचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *