भज्जी-सायमंड्स इतिहासातील सर्वात मोठा वाद, जाणून घ्या काय प्रकरण


मुंबई : क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. 1998 ते 2009 साठी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याचं देशासाठी मोठं योगदान होतं. 

सायमंड्स आपल्या करिअर आणि खेळासोबत काही वादांमुळेही चर्चेत आला. हरभजन सिंगसोबत सर्वात मोठा वाद झाला होता. हा वाद क्रीडा विश्वातील खेळाडू आणि चाहते कधीच विसरू शकत नाहीत. 2007-08 मध्ये हरभजन सिंग आणि सायमंड्स यांच्या झालेला वाद हा इतिहासातील सर्वात मोठा वाद ठरला. 

2007-08 मंकीगेट वाद

टीम इंडिया 2007-08 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. तेव्हा सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात सिडनीच्या मैदानावर मोठा वाद झाला. या सामन्यात अत्यंत खराब अंपायरिंग पाहायला मिळालं. 

या सामन्यादरम्यान, हरभजन सिंग फलंदाजी करत असताना अँड्र्यू सायमंड्ससोबत वाद झाला. त्यानंतर कर्णधार रिकी पाँटिंगला राग आला आणि त्याने हरभजनविरुद्ध अंपायरकडे तक्रार केली. 

भज्जीवर स्लेजिंग आणि वर्णद्वेषाचा गंभीर आरोप पाँटिंगने केल्यामुळे त्याने मर्यादा ओलांडली. हरभजनने सायमंड्सला मैदानावर ‘माकड’ म्हटलं होतं, असा दावा त्यावेळी सायमंड्सने केला होता. 

आयसीसीच्या नियमानुसार अशीप्रकारचं डिवचणं अत्यंत गंभीर आरोप आहे. याला लेव्हल 3 चा अपराध मानला जातो. अशावेळी दोन किंवा चार कसोटी सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते. या प्रकरणी सुनावणी रात्री उशिरापर्यंत चालू होती. 

या प्रकरणानंतर हरभजनवर तीन कसोटी सामन्यांवर बंदी लावण्यात आली होती. खरा वाद या सगळ्यानंतर सुरू झाला. टीम इंडिया आणि अनिल कुंबळे यांनीही हरभजनला सपोर्ट केला. भज्जीवरचे आरोप मागे घ्या नाहीतर पुढची मॅच खेळणार नाही असा इशारा टीम इंडियाच्या खेळाडूंनी दिला होता. 

या सगळ्या वादानंतर भज्जीवरचे आरोप बिनबुडाचे असल्याचे न्यूझीलंडचे जज जॉन हॅन्सन यांनी सांगितलं. हरभजनने मंकी नाही तर तेरी मां की… असं म्हटल्याचं समोर आलं. त्यामुळे याला मंकीगेट विवाद असं ओळलं गेलं. हरभजनला जेव्हा निर्दोष असल्याचं सांगितलं तेव्हाच टीम इंडियाचे खेळाडू पुढचा सामना खेळायला तयार झाले.

सायमंड्सचे करिअर

अँड्र्यू सायमंड्सला जगात महान क्रिकेटर म्हणून ओळखलं जात होतं. ऑस्ट्रेलियाकडून त्याने 26 कसोटी, 198 वन डे आणि 14 टी 20 सामने खेळले होते. त्याने 198 वन डे सामन्यात 1462 केले. तर कसोटीमध्ये 5088 रन केले. टी 20 सामने 337 धावा केल्या. त्याने 39 आयपीएल सामने खेळले. 2003 आणि 2007 मध्ये वर्ल्ड कप देशाला जिंकून देण्यात त्याचा वाटा होता. Source link

Leave a Reply