‘भाई होगा आपका… मेरी तो जान है वो’, अखेर ‘या’ महिला खेळाडूकडून सलमानवरील प्रेम व्यक्त


मुंबई : अभिनेता (Salmank khan) सलमान खान याच्याभोवती असणारा महिलांचा गराडा खूप काही सांगून जातो. पुरुषांपेक्षा भाईजानला महिला वर्गाकडून कमालीची लोकप्रियता मिळते. अशा या भाईजावरील आपल्या प्रेमाची कबुली सध्या जागतिक स्तरावर चर्चेत असणाऱ्या एका महिला खेळाडूनं केली आहे. 

नुकतंच World Women Boxing Championship चं जेतेपद मिळवून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या निखत झरीन हिनं एका मुलाखतीमध्ये त्याच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. 

सलमाननंही तिला शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न करत मुलाखतकारांनी तिला त्यावरील प्रतिक्रियांसाठीचा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना, ‘कोण भाई? तुमचा भाई? कधी (त्याला) भाई वगैरे नाही म्हटलेय… लोकांचा भाई असेल तो… पण माझ्यासाठी तो माझा जीव आहे…. मेरी जान…..’, असं निखत म्हणाली. 

सलमानप्रती एक चाहती म्हणून असणारं तिचं हे प्रेम क्षणार्धातच सर्वांच्या नजरा वळवून गेलं. आपण सलमानची सर्वात मोठी चाहती असल्याचं सांगत निखतनं त्याला एकदा तरी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 

बॉक्सर निखत झरीनचा 'गोल्डन पंच'; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

माझी एकच इच्छा आहे, ती म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जिंकण्याची आणि तिथून थेट मुंबईला जात सलमानला भेटण्याची. बरं, सलमानवरील प्रेम व्यक्त करण्याची निखतची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिनं बऱ्याचदा सलमानवर असणारं आपलं निस्वार्थ प्रेम व्यक्त केलं होतं. 

आपल्या या चाहतीचं प्रेम पाहता सलमाननंही तिला विजेतेपद मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कला जगतातून इतरही बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनी निखतवर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण, यातही तिच्यासाठी अपेक्षित आणि अतिशय प्रेमाळ शुभेच्छा सलमानचीच होती हे खरं. Source link

Leave a Reply