Headlines

सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय तर सावधान

सोलापूर पोलिसांनी सांगितलेल्या 15 गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या..

१. क्रेडीट कार्डने ऑनलाईन खरेदी करा परंतु गिफ्ट कार्ड, मनी ट्रान्सफर किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे पेमेंट स्विकारणाऱ्या ऑनलाईन विक्रेत्यांकडुन काळजीपूर्वक व्यवहार करा ते बनावट असु शकतात.

२. कोणत्याही नविन वेबसाईटवरुन खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल संपुर्ण माहीती गोळा करा.

३. विक्रेत्याने एखादया विशिष्ट ब्रँडला मोठ्या सवलतीत ऑफर केल्यास, ते बनावट असु शकते.

४. डेबिट कार्डासह ऑनलाईन शॉपींग टाळा, कारण जर तुमच्या कार्डमध्ये छेडछाड (क्लोनिंग) झाली असेल तर पैसे थेट तुमच्या बँक खात्यातुन घेतले जातात. त्यामुळे तुम्हाला मोठी हानी होण्याचा धोका संभवतो.

५. कोणत्याही अज्ञात लिंक, क्युआर कोड स्कॅनरवर क्लिक करु नका, ऑनलाईन फसवणुक करणारे हे तंत्र खुप वापरतात.

६. अनेकदा फोनवर किंवा ई-मेलवर तुमच्या एटीएम किंवा क्रेडीट कार्ड, पिन नंबर, सीव्हीव्ही, कालमर्यादा याची माहीती शेअर करु नका.

७. नेहमी विश्वसनीय वॉलेट, वेबसाईटवरुन खरेदी करा. यदाकदाचित विश्वसनीय वॉलेट वेबसाईवरुनही आर्थिक फसवणुक झाल्यास त्याबाबत आपणास दाद मागण्यास व माहीती मिळण्यास वाव मिळतो.

८. ऑनलाईन शॉपिंग करीत असताना नेहमी सुरक्षीत वेबसाईटचा वापर करा (https:// असणा-या वेबसाईट सुरक्षीत असतात.)

९. ऑनलाईन वेबसाईट/वॉलेटला लॉगीन करीत असताना नेहमी unique and strong password ठेवावा. तसेच तो नेहमी ठराविक वेळेने बदलत रहावा.

१०. एसएमएस, व्हॉट्सअॅप माध्यमाद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन शॉपींग करणे टाळा.

११. मोफत / पब्लिक वाय-फाय वापर करताना डेबिट/क्रेडीट कार्डचा वापर करुन शॉपींग करु नये.

१२. ऑनलाईन शॉपींग करताना थेट बँक खात्याऐवजी क्रेडीट कार्ड अथवा वॉलेटचा वापर करावा.

१३. ऑनलाईन वेबसाईट व वॉलेटवर आपले कार्ड डिटेल्स, पासवर्ड शक्यतो जतन करून ठेवु नका.

१४. ऑनलाईन शॉपींग झाल्यानंतर नेहमी आपले व्हॉलेट, बैंक खाते तपासावे. व आपण केलेल्या ऑनलाईन व्यवहाराव्यतिरीक्त इतर व्यवहार झालेले आहेत काय याची खात्री करावी.

१५. नेहमी ऑनलाईन/व्हॉलेट खाते लॉग आऊट करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *