Headlines

बीसीसीआयची लवकरच बैठक, स्टार खेळाडूचं भवितव्य ठरणार

[ad_1]

मुंबई : शिखर परिषदेची (Apex Council) 23 एप्रिलला मुंबईत वानखेडे स्टेडियमजवळ असलेल्या बीसीसीआयची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.  या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे टीम इंडियाचा विकेटकीपर चर्चेत येणार आहे. या बैठकीत रिद्धीमान साहा वादाप्रकरणी अहवालाची समिक्षा करण्यात येणार आहे. त्यामुळे तेव्हाच निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. (bcci apex council meeting held to 23 april in mumbai wriddiman saha controversy t 20 world cup ind vs sa series)

शिखर परिषदेच्या बैठकीत साहा व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका मालिका आणि टी 20 वर्ल्ड कपबाबतही चर्चा होणार आहे. 

या विषयावर होणार बैठक

शिखर परिषदेची मागील काही बैठकांमध्ये अनेक मुद्द्यांवरील चर्चा ही अपूर्ण राहिली. या अपूर्ण राहिलेल्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 

दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही टीममधील मालिकेचं ठिकाण ठरवण्यात येणार आहे. या विषयावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 

रिद्धीमान साहा वादाप्रकरणी एक समिती नेमण्यात आली. या समितीने वादाप्रकरणी ठेवलेल्या अहवालावर समिक्षा केली जाणार आहे. 

आगामी टी 20 वर्ल्ड कपबाबतही चर्चा होणार आहे. 

रिद्धीमान साहाचा वाद नक्की काय?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात मालिका खेळवण्यात आली. रिद्धीमानला या मालिकेतून बाहेर करण्यात आलं. यानंतर सातत्याने साहाच्या अडचणीत वाढ होत गेली. साहाने आधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि कोच राहुल द्रविड यांच्यासोबतचे खासगी चॅट सार्वजनिक केले. तसेच एका पत्रकारानेही मुलाखत देण्यास नकार दिल्याने साहाला धमकी दिली होती. साहाने याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.

बीसीसीआयनुसार अध्यक्ष आणि कोचसोबतचे खासगी चॅट व्हायरल करणं हे नियमांचं उल्लंघन आहे. यामुळे साहाला नोटीस देण्यात आली. तसेच साहाला धमकी देणाऱ्या पत्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. बीसीसीआयने या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. 

ही त्रिसदस्यीय समिती साहा संबंधित सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे. या समितीत राजीव शुक्ला, अरुण धुमाळ आणि शिखर परिषदेचे प्रभतेज सिंह यांचा समावेश आहे. या समितीने आपला अहवाल बीसीसीआयसमोर ठेलला आहे. आता बीसीसाआय या अहवालावर बैठकीत चर्चा करणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *