Headlines

BCA च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोटने मिळवून दिला न्याय


प्रतींनिधी/जयकुमार सोनकांबळे –सी,बी खेडगी महाविद्यालयात बीसीए द्वितीय वर्षात शिकत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षातील काही विषय बॅक आहेत त्यांची परीक्षा उद्या पासून सुरू होणार आहे पण कॉलेज मधल्या संबंधित विषयाच्या प्राध्यापकांनी परीक्षा संदर्भात कोणतीच सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली नसल्याचे समोर आले आहे व विद्यार्थी परीक्षा संदर्भात माहिती विचारल्यानंतर उडवा उडवी चे उत्तरे प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मिळाले त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटी सदस्य तथा अक्कलकोट तालुका अध्यक्ष रविराज पोटे यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी त्यांना सांगितल्या व चर्चा केली त्यानंतर रविराज पोटे यांनी कॉलेजच्या प्राचार्य सोबत चर्चा केली त्यावेळी प्राचार्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधण्यास सांगितले त्यानंतर रविराज पोटे यांनी विद्यापीठाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांनी लगेच त्याची दखल घेत विद्यार्थ्यांचे PRN नंबर पासवर्ड आणि ऑनलाइन परीक्षा ची लिंक त्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबर वर सेंड केले आणि तुम्ही उद्या परीक्षा देऊ शकता असे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *