बस्सं झालं, मी नाचणार नाही…; असं का म्हणतोय Rohit Sharma?


मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला डान्स करताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र कर्णधार रोहित शर्माला नाचताना फार कमी लोकांनी पाहिलं असेल. नुकताच विराटचा एक भांगडा करतानाचा व्हिडियोही व्हायरल झाला होता. तर त्यानंतर आता रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये रोहित मी नाचणार नाही असं म्हणतोय.

आयपीएलची टीम मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीयो शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसतोय. हे एखादं शूट असल्याचं लक्षात येत असून, यामध्ये रोहित शर्मा ‘मै नाचेगा नहीं’ असं म्हणतोय. 

या व्हिडीयोमध्ये तुम्ही पाहू शकता, शूट करणाऱ्यांना रोहित शर्मा म्हणतोय, की अजिबात नाचणार नाही. शिवाय डान्ससंदर्भात काही हातवारे देखील करणार नाही. बस्स झालं. यावेळी रोहितला थोडा कंटाळा आल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून पहायला मिळतंय. 

मात्र पुढच्याच क्षणी, रोहित शर्मा त्याच्या टीममेट्ससोबत मस्त आनंदाने नाचताना दिसतोय. युजर्सना हा व्हिडीयो खूप आवडलेला दिसतोय. अनेकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून भरपूर कमेंट्सही केल्या आहेत. 

रोहित शर्मा म्हणतो ‘जय हो’

नुकतंच इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव एका चाहत्याशी गप्पा मारत होते. सूर्यकुमार, रोहित आणि पंत व्हिडीओ चॅटवर असल्याचं पाहून त्याला विश्वासच बसत नव्हता. दिग्गज खेळाडूंशी आपण संवाद साधतोय यावर तो मराठमोळा चाहता आई शप्पथ असं म्हणाला. 

दरम्यान या मराठमोळ्या चाहत्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये जिकलेल्या ट्रॉफी रोहित आणि सुर्यकुमारला दाखवल्या. यावेळी घरात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील त्याने खेळाडूंना दाखवली. महाराजांची मूर्ती पाहताच रोहित शर्मा लगेच ‘जय हो’अशी घोषणा करताना दिसला. त्याच्या या कृत्यामुळे सगळेजण त्याचं कौतुक करताना दिसतायत.Source link

Leave a Reply