Headlines

बार्शी ते मोहोळ रस्त्यादुरुस्तीची मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी

बार्शी – बार्शी ते मोहोळ व सुर्डी ते सेंद्रीफाटा  या रस्तायावरील कव्हे व मालवंडी या ओढयावरील पुलाच्या बाधकामास मंजूरी देऊन  निधी उपलब्ध करून द्यावा.  खड्डे बुजवून नवीन रस्ता करावा अशी मागणी रेखा  सूर्यकांत चिकणे व सूर्यकांत गोविंद चिकणे  यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांच्याकडे केली आहे .सदरचे निवेदन मा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सोलापूर यांचेकडे सादर केले आहे .

    बार्शी ते मोहोळ व सुर्डी ते सेंद्री फाटा या रस्तायावरील खड्डे बुजवून नवीन रस्ता करावा,. कव्हे व मालवंडी या ओढयावरील पुलाच्या बांधकामला चाळीस वर्ष झाली आहेत ,हा पुल अरूंद व लहान आहे, त्याचे आयुर्मान कमी झाले आहे .

    तरी बार्शी ते मोहोळ या रस्तायावरील खड्डे बुजवून नवीन रस्ता करावा , कव्हे,मालवंडी या गावातील ओढयावरील पुलाचे, बांधकामास प्रशासकीय मंजूरी देउन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नेहरू युवती मंडळाच्या अध्यक्ष  रेखा सूर्यकांत चिकणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *