
खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पेरणी करतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत कृषी विभागानेही शेतकऱ्यांना जाहीर आवाहन केले आहे.
- पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा.
- रणीपूर्व बीजप्रक्रीया करावी.
- चांगली ओल म्हणजे ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.
- ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी,७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.
- प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा बी. बी. एफ. पद्धतीचा वापर करून पेरणी करावी.
- सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात याव.
- पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.
- रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.
- बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे.
असे आवाहन बार्शी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी केले आहे.