बार्शीतील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्या – मानवी हक्कांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

बार्शी / प्रतिनिधी – बार्शी येथे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,मानवधिकार अधिकार कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे आणि दहशत निर्माण करणे अशा व्यक्तीं वरती योग्य ते प्रतिबंधक कारवाई करून सामाजिक कार्यकर्ते यांना लोकांना संरक्षण द्यावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेचे संस्थापक विकास कुचेकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सोलापूर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते सोलापूर ग्रामीण यांना केली आहे.

बार्शी येथील काही पत्रकार,काही सामाजिक कार्यकर्ते, काही माहिती अधिकार कार्यकर्ते,काही मानवाधिकार कार्यकर्ते यांच्याकडून मिळालेली माहिती तसेच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असणाऱ्या बातम्या व पोलीस स्टेशन बार्शी कार्यालयाकडे संबंधित पीडितांनी केलेल्या तक्रारीस दाखल झालेले गुन्हे यानुसार मानव अधिकाराबाबत होणाऱ्या उपेक्षा, मूलभूत मानवी अधिकार मान्य व्यक्तीची जन्मजात प्रतिष्ठा योग्यता स्त्री-पुरुष समान हक्क तसेच भाषण स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य भय व दुजाभावापासून मुक्ती असे सर्वसाधारण लोकांची अपेक्षा शाबूत राहण्यासाठी तसेच कोणत्याही सुसंस्कृत समाजातील लोकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे व ते वृद्धिंगत करणे ही प्रगतीशील लोकशाही सरकारची व कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या प्रशासन यंत्रणेची जबाबदारी आहे.

असे असले तरी बार्शी मध्ये लोकशाही प्रशासनाला कार्यकर्ते यांच्यावर समाजात होत असणाऱ्या गैरकृत्य बाबत भारतीय संविधान आर्टिकल 51 अ प्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्य समजून गैर कृत्याबाबत प्रशासनाकडे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी त्यातील भ्रष्टाचाराबाबत माहितीच्या अधिकाराचा वापर करून गैरकारभार उघड करणे आणि अशा गैर कारभाराची पत्रकार म्हणून वर्तमानपत्रातून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी करून जनजागृती करणे असे कार्य करत असलेल्या बार्शीतील पत्रकारांवर, सामाजिक कार्यकर्त्यां वरती तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांना लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत मानवी हक्कांवर अतिक्रमण करून भारतीय संविधानातील आर्टिकल 14 ते 21. दडपशाहीने व दमदाटी करून दहशत निर्माण करून खोटे गुन्हे नोंद करून घाबरवण्याचा दहशत निर्माण करण्याचा आणि त्यांच्या सामाजिक कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न बार्शीत काही लोकांकडून केला जात आहे.

याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्वतः लक्ष घालून पोलीस निरीक्षक व जिल्हाधिकारी यांनी बार्शी पोलिस स्टेशनला बार्शीतील लोकांनी केलेल्या तक्रारी अर्जाची स्वतः शहानिशा करावी त्या तक्रारी वरती कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ती कारवाई करण्यात यावी तसेच बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,माहिती अधिकार कार्यकर्ते यांना भय व दुजाभाव पासून, दडपशाही पासून संरक्षण देण्यात यावे किंवा त्या दृष्टिकोनातून प्रतिबंधक उपाय योजना करण्यात याव्यात अशी विनंती सदर निवेदनाद्वारे मानवी हक्क संरक्षण व जागृती चे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकरयांनी केली आहे.निवेदनाची घेतलेली दखल झालेली कारवाई महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पत्राने कळवण्यात यावी अशी सुद्धा मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे.

Leave a Reply