Headlines

बार्शी – या दुकानांना कृषी विभागाने दिला बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश

बार्शी – बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली आहे . शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रविंद्र कांबळे , तालुका कृषी अधिकारी बार्शी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत.

विक्री बंद आदेश दिलेल्या दुकानांची नावे

• श्री सोनार महाराज कृषी केंद्र वैराग • गावसाने ऍग्रो एजन्सी वैराग • संघवी अग्रो एजन्सी वैराग • भुमकर कृषी सेवा केंद्र वैराग • समर्थ कृषी केंद्र वैराग • बालाजी कृषी केंद्र वैराग • समृद्धी कृषी केंद्र वैराग • भगवंत कृषी एजन्सी बार्शी • जगनाडे ऍग्रो एजन्सी बार्शी

कृषी सेवा केंद्र यांनी कोणत्याही प्रकारची फसवणूक करू नये शेतकर्‍यांना योग्य दरात व चांगली खत बियाणे उपलब्ध करून द्यावी . कोणी फसवणूक केली तर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी – शहाजी कदम ,तालुका कृषी अधिकारी बार्शी

या कृषी सेवा केंद्रातील महाबीज ,निर्मल सीड्स ,स्वयम् सीड्स, कल्पवृक्ष सीड्स ,दिव्य सीड्स ,संजय सीड्स ,सागर सीड, यशोदा सीड्स, न्होवा गोल्ड सिड , व्हिगोर बायोटेक ,हरित क्रांति सीड ,रायझिंग सन सीड ,पंचगंगा सीड ,ओम साई सीड ,सिद्ध सीड ,विनय सीड्स ,वसंत रूप सीड या कंपन्यांचे 657 क्विंटल सोयाबीन बियाणे, 33 क्विंटल तूर बियाणे, 53 क्विंटल उडीद बियाणे ,4 क्विंटल मका बियाणे , 2 क्विंटल मूग बियाणे इत्यादी विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ह्या कारणांनामुळे दिले बियाणे विक्री बंदचे आदेश

विक्री करताना दुकानदाराकडे खरेदीची बिले नसणे, लिंक बिले नसणे, स्टेटमेंट 1 व 2 नसणे , प्रमाणित बियाण्याचे रिलीज ऑर्डर नसणे विक्री परवाना यामध्ये कंपनीचा समावेश नसणे खरेदी रजिस्टर साठा व विक्री रजिस्टर अपूर्ण असणे इत्यादी कारणे आहेत. ही कारवाई प्रभारी गुणनियंत्रण कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील यांच्यासह वैराग मंडळ चे कृषी पर्यवेक्षक एन बी जगताप , संजय कराळे , भारत महांगडे , रघुनाथ कादे , .अण्णा नलवडे यांच्या उपस्थितीत झाली.

Leave a Reply