Headlines

बार्शी – डॉ. प्रविण मस्तुद यांची महाराष्ट्र शासनाच्या समितीवर नियुक्ती

बार्शी / प्रतिनिधी – डॉ. प्रविण मच्छिंद्र मस्तुद यांची महाराष्ट्र शासनाच्या समितीवर शासन आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मस्तुद हे श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय येथे येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असून आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव तसेच राज्य संयुक्त कृती चे प्रवर्तक आहेत.

अधिक माहिती अशी की; अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ही समिती गठीत केली आहे. मा.उच्च शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर यांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत समिती गठीत करण्याचे निर्देश दिले होते.

या समितीची लवकरच बैठक होत असल्याने विद्यापीठ संलग्न महाविद्यालय शिक्षकेतरांचे प्रश्न निवेदने [email protected] 9960312963 या भ्रमणध्वनीवर वर प्रश्न पाठवावेत असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *