दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना बार्शी शहर पोलिसांचे आवाहन

दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना बार्शी शहर पोलिसांचे आवाहन

महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आपापले दागदागिने, मौल्यवान वस्तू व लहान मुले व्यवस्थित सांभाळावेत.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर व पाकीटमार यांचे पासून सावध रहावे.

नागरिकांनी खरेदीस जाताना, आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी अथवा पार्कंगमध्ये पार्क करावी.

दिवाळी सणामध्ये मोबाईल फोन अथवा इतर माध्यमांद्वार प्राप्त होणारे विविध बक्षीसांच्या योजनांना तसेच आमिषांना बळी पडू नका.

आपल्या बँकेचा व ए. टी. एम. कार्डवरील तपशील तसेच मोबाईल मध्ये प्राप्त होणारा ओ. टी.पी. क्रमांक याची माहीती कोणालाही देऊ नका.

वयोवृद्ध लोक हाईल असे मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नका. फटाक्याची आतिषबाजी व ध्वनी प्रदूषण टाळा.

दिपावलीच्या सुटटीत गावी जाताना आपले शेजारी यांना घरावर लक्ष ठेवणेस सांगावे, तसेव मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये.

असे आवाहन दिवाळी सणानिमित्त बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी केले आहे.

Leave a Reply