बार्शी ॲडव्होकेट्स बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

बार्शी / प्रतिनिधी- बार्शी (barshi) बार असोसिएशन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड विकास जाधव, सहा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड सुनील कुलकर्णी ,सहा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड शंकर ननवरे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.


बार्शी बार असोसिएशनचे सदस्य संख्या ५१३ असून त्यापैकी मतदानास पात्र सदस्य संख्या २८१ आहे. बार असोसिएशनची मतदार यादी प्रसिद्ध झालेली असून आजपासून फॉर्म भरण्याची मुदत सुरू झालेले आहे. दिनांक २. १२. 20२१ रोजी पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत असून उमेदवारी अर्जाची छाननी दिनांक दिनांक ३.१२.२०२१ रोजी आहे उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत ४.१२.२०२१ पर्यंत आहे दिनांक १३.१२.२०२१ रोजी मतदान व मतमोजणी व त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.


बार्शी बार असोसिएशनचे आतापर्यंतच्या सर्व निवडणुका प्रतिष्ठेच्या झालेल्या आहेत . कोरोना महामारी मुळे दोन वर्ष निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे मावळते अध्यक्ष ॲड काकासाहेब गुंड व उपाध्यक्ष ऍड रत्नमाला पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना मुदत वाढवून मिळालेली होती. सध्या कोरोंनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सूचनेनुसार निवडणुका घेण्यात येत आहेत .

बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव ,खजिनदार ,लायब्ररी चेअरमन व मॅनेजमेंट कमिटी सदस्य चार पदाधिकारी निवडीकरिता हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे . निवडणूक कार्यक्रम हा तंतोतंत व कायदेशीर नियमांचे पालन करून कोरोना नियमांचे पालन करून राबविला जाईल वकील हा समाजासमोर आदर्श निर्माण करणारा घटक आहे . त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व घटका समोर आदर्श निर्माण करावा या निवडणुकीतून लोकांना चांगला संदेश मिळावा असे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड विकास जाधव यांनी सांगितलं . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ॲड सुनील कुलकर्णी , ॲड शंकर ननवरे, लायब्ररियन ॲड अक्षय रानमाळ हे उपस्थित होते.

Leave a Reply