Headlines

‘बारामतीत सुप्रियाच सुळेच निवडून येणार’ म्हणणाऱ्या अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचं आव्हान, म्हणाले “यावेळी परमेश्वरही…” | BJP Chandrakant Patil on NCP Ajit Pawar Supriya Sule Baramati Constituency sgy 87



राज्यात एकीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळत असताना, दुसरीकडे बारामती मतदारसंघावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असल्याने, राष्ट्रवादी नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. बारामतीमधील जनता पवार कुटुंबालाच निवडून देणार असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला असताना, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘माझी जात, गोत्र आणि धर्म फक्त शिवसेना’, उद्धव ठाकरेंसह आनंद दिघेंचा फोटो, पुण्यातील बॅनरची चर्चा

बारामतीत भाजपाकडून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, त्याचा काही फरक पडणार नाही. सुप्रिया सुळे यांचं काम बोलतं, त्यामुळे त्या निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. एबीपीशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “गेल्या वेळी सुप्रिया सुळे थोडक्यात वाचल्या. यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही. आमचे प्रयत्न सुरु आहेत. प्रयत्न करणारा प्रत्येकजण यश मिळावं यासाठीच प्रयत्न करत असतो”. महाराष्ट्रात सुख, समृद्धी आणि सुरक्षा सर्वसामान्यांना प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

अजित पवारांची भाजपा नेत्यांवर टीका

पुण्यात बोलताना अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, २०१९ची एक आठवण करून देत खोचक टोला देखील लगावला आहे. बारामतीकरांना कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहितीये, अशी उपहासात्मक टिप्पणी यावेळी अजित पवारांनी केली.

“कुणाचं बटण कसं दाबायचं हे…”, अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला; २०१९ची करून दिली आठवण!

“आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात आणि लक्ष्य करतात. गेल्या ५५ वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगलं माहितीये की कुणाचं बटण कशा पद्धतीने दाबायचं. ते त्या निवडणुकीत त्यांचं काम चोखपणे बजावतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“बारामतीत माझं काम बोलतं”

“बारामतीमध्ये माझं काम बोलतं. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील”, असंदेखील अजित पवार म्हणाले.

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते”

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना एक हुरूप येतो. आपण काहीतरी करतो वगैरे. ते अध्यक्ष बारामतीला न जाता दुसरीकडे गेले असते, तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते बारामतीला गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला एवढी प्रसिद्धी मिळाल”, असा टोला पवारांनी लगावला.

“मला त्या प्रदेशाध्यक्षांना एक प्रश्न विचारायचाय, की तुम्ही एवढे संघटनेत काम करणारे, पक्षाच्या जवळचे होता, तर तुम्हाला, तुमच्या पत्नीला २०१९ला उमेदवारी का नाकारली? त्याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही. अर्थात, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण माझं मत आहे की कुणीही बारामतीत यावं. बारामतीकर सर्वांचं स्वागतच करतात. पण मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचं, कुठं बटण दाबायचं, हे बारामतीकरांना खूप चांगलं माहिती आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला.



Source link

Leave a Reply