Headlines

बापरे! चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी ‘ती’ पहिली Actress

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत, जे एका चित्रपटासाठी करोडो रुपये फिस घेतात. या पक्तीत अभिनेत्रींचे प्रमाण फारचं कमीच आहे. मात्र ही एक अभिनेत्री अशी होती जी, त्यावेळी फक्त हिरोंचेच चित्रपट चालायचे, त्याकाळी ती एका चित्रपटासाठी तब्बल एक कोटीची फिस घ्यायची. ही अभिनेत्री आहे तरी कोण ते जाणून घेऊयात.  

बॉलिवूडची हवा हवाई गर्ल श्रीदेवीचा (Sridevi Birth Anniversary) आजच्या दिवशी 13 ऑगस्ट 1963 रोजी जन्म झाला होता. तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात तिचा जन्म झाला होता. श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. यानंतर ती थांबलीच नाही तब्बल 50 वर्षे तिने अनेक उत्तमोत्तम चित्रपट देत इंडस्ट्रीवर राज्य केलं होतं.  

श्रीदेवीने (Sridevi Birth Anniversary) 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिक्स्टीन सावन’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण 1983 मध्ये हिम्मतवाला या चित्रपटाद्वारे श्रीदेवीने (Sridevi)  जोरदार पुनरागमन केले. यानंतर तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. श्रीदेवीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपट केले होते. यामध्ये हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे. 

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता ज्यावेळेस हिरोंनाच महत्व होते. या हिरोंच्या नावावरूनच चित्रपट चालायचे. अभिनेत्रींना त्या काळी जास्त किंमत नव्हती. या दरम्यान श्रीदेवीने (Sridevi) उत्कृष्ट अभिनयाने अभिनेत्रींच वजन वाढवलं होत. यानंतरच अभिनेत्रींच्या कलेला वाव मिळत गेला. विशेष म्हणजे ज्या काळात सहसा फक्त हिरोलाच करोडो रुपये मानधन मिळायचे. त्या काळात श्रीदेवी (Sridevi)  या एकमेव अभिनेत्री होत्या ज्या एक कोटी रुपये मानधन घ्यायच्या, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली होती.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवीचे (Sridevi) स्टारडम इतके होते की एकेकाळी तिच्या यशाने सुपरस्टार सलमान खान देखील घाबरला होता. एका मुलाखतीत सलमानने स्वत: याचा खुलासा केला होता, तो श्रीदेवीसोबत काम करताना नर्व्हस होतो आणि त्याला वाटत होते की, जर त्याने श्रीदेवीसोबत काम केले तर त्याच्या कामाची कोणीही दखल घेणार नाही, सर्वांच्या नजरा फक्त श्रीदेवीवरच (Sridevi) राहतील, असे त्याने म्हटले होते. 

बॉलिवूडमधल्या श्रीदेवी (Sridevi)  या उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. 24 फेब्रुवारी 2018 रोजी तिने जगाचा निरोप घेतला. या घटनेने बॉलिवूड हळहळला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *