बापरे…. Bobby Deol कडून अभिनेत्रीला ‘1 नाईट स्टँड’ची ऑफर? तिने दिलेल्या उत्तरानंतर…


मुंबई : अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या ‘आश्रम 3’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये ‘बाबा निराला’च्या रुपात बॉबी अनेक बोल्ड सीन करताना दिसणार आहे. सध्या सीरिजमुळे चर्चेत असणारा बॉबी त्याच्या अफेअर्समुळे देखील चर्चेत आला. फक्त अफेअर्सचं नाही तर बॉबीने एका प्रसिद्ध अभिनेत्रीला ‘1 नाईट स्टँड’ ऑफरची ऑफर देखील दिली होती. ज्यामुळे बॉबी वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला. 

बॉबीने ज्या अभिनेत्रीला ‘1 नाईट स्टँड’ची ऑफर दिली होती, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ममता कुलकर्णी होती. एका मुलाखतीमध्ये ममताने बॉबीने दिलेल्या ऑफरचा खुलासा केला. 

बॉबी देओलच्या ‘बरसात’ सिनेमाची शूटिंग सुरू होती आणि तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ममताही तिच्या एका सिनेमाच्या निमित्ताने त्याच हॉटेलमध्ये थांबली होती. 

ममताच्या सिनेमात अभिनेते मिथुन चक्रवर्तीही देखील होते. त्याचवेळी मिथुन दा यांनी ममता यांना बॉबी देओलची भेट घडवून आणली होती. ममताचं सौंदर्य पाहून बॉबी तिच्यावर फिदा झाला आणि अभिनेत्रीला ‘1 नाईट स्टँड’ची ऑफर दिली. 

बॉबी देओलच्या वन नाईट स्टँडबद्दल ऐकल्यानंतर ममताने दिलेले उत्तर ऐकून अभिनेत्याला देखील धक्का बसला. ममता म्हणाली की, जर तुला  माझ्यासोबत एक रात्र घालवायची असेल, तर त्यासाठी आधी गर्लफ्रेंडची परवानगी घ्यावी लागेल….’

ममताचं सडेतोड उत्तर ऐकून बॉबीला मोठा धक्का बसला. त्यानंतर परिस्थिती सावरत मस्करी करत असल्याचं त्याने ममताला सांगितलं. तेव्हा बॉबी आणि पूजा भट्ट एकमेकांना डेट करत होते. Source link

Leave a Reply