बापरे! अमृताकडून Dance शिकण्यासाठी भर रस्त्यात तिला अडवलं आणि….


मुंबई : एक अनोखी आणि तितकीच वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि एकच कल्ला झाला. हा कल्ला, शिट्ट्या आणि टाळ्या पडल्या एका अप्रतिम कलाकृतीवर. अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून गतकाळातील अतिशय महत्त्वाच्या घडामोडीवर प्रकाशझोत टाण्यात आला आहे. 

राजकारण आणि कलाजगताशी थेट संबंध असणाऱ्या कथानकाला हात घालत प्रसाद ओक यानं ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि पाहणाऱ्यांच्या नजराही त्यावरच खिळल्या. (chandramukhi)

चित्रपटामध्ये अमृता एका लावणी नृत्यांगनेच्या भूमिकेत दिसत आहे. फडावर लावणी करणारी व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अमृतानं कमाल मेहनत घेतली. तिच्या नृत्याची झलक पाहता हे लगेचच लक्षात येत आहे. (amruta khanvilkar )

अशा या अभिनेत्रीनं नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिथून निघत असताना तिला एकानं गाठलं आणि तिथेच जागच्या जागी डान्स शिकवायला सांगितलं. 

गावाकडे जत्रा आहे, असं सांगत त्यानं अमृताला अगदीच आग्रह केला. ज्यामुळं तिनं शेवटी त्याला काहीतरी शिकवायला सुरुवात केली आणि त्यानं एकाचं दोन करत तिच्यासमोर उलटसुलट नाचण्यास सुरुवात केली आणि अमृतानंही कपाळावर हात मारला. 

अमृताला पश्चाताप होण्याची वेळ आणणारा हा व्यक्ती दुसरातिसरा कोणी नसून, तो आहे युट्यूबर विनायक माळी. आगरी बोलीभाषेमध्ये व्हिडीओ , रिल करत प्रचंड लोकप्रिय झालेल्या विनायक माळी यानं कमी वेळातच लोकप्रियता मिळवली. 

हल्ली विविध चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं विनायक बऱ्याच सेलिब्रिटींसोबत कोलॅबरेशन करताना दिसतो. यावेळीसुद्धा त्यानं अमृतासोबत एक धमाल व्हिडीओ करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आणि पाहणाऱ्यांना मनमुराद हसवलं. Source link

Leave a Reply