बापरे! 5 मिनिटं ‘त्या’ अभिनेत्यानं रेखा यांना… टाळ्या तर अनेकांनी वाजवल्या, दया कोणालाच आली नाही


मुंबई : झगमगत्या विश्वाचं काळं सत्य म्हणजे अभिनेत्रींची होणारी पिळवणूक. फक्त अभिनेत्री रेखाच (Rekha) नाही तर अनेक अभिनेत्रींना करियरच्या वाट्यावर वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. बॉलिवूडची एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आज अनेक उभरत्या अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी आहेत. पण हे स्थान निश्चित करण्यासाठी रेखा यांना प्रचंड खस्ता खावा लागला आहे. आज रेखा यांच्या समोर मोठ्या अभिनेत्री देखील फिक्या आहेत. रेखा यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल जग अजूनही अनभिज्ञ आहे.  (Rekha Was Forcibly Kissed By Biswajeet At 15)

बॉलिवूडवर वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या रेखा यांनी एका अभिनेत्याने मिठीमध्ये 5 मिनिटे धरलं आणि किस केलं. तेव्हा त्या प्रचंड रडल्या.  रेखा यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड चढ-उतार पाहिले. आईवर प्रचंड कर्ज असल्यामुळे त्यांना वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षापासून काम करावं लागलं होतं. (anjana safar movie songs)

मीडिया रिपोर्टनुसार, रेखा जेव्हा लहान वयात काम करून थकून जायच्या आणि कामावर जाण्यास नकार द्यायच्या तेव्हा त्यांचे भाऊ त्यांना मारहाण करायचे. यासीर उस्मान यांनी त्यांच्या ‘रेखा: अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात एका चित्रपटाच्या शूटिंगचा उल्लेख केला आहे. (Rekha Kiss Controversy )

पुस्तकात असे लिहिले आहे की, ‘अंजना सफर’ (Anjana safar) चित्रपटाचे दिग्दर्शक राजा नवाठे आणि अभिनेते विश्वजीत यांनी रेखाला त्रास देण्यासाठी एक सीन शूट करण्याची योजना आखली होती, ज्याबद्दल रेखाला सांगितले गेले नव्हते.

15 वर्षीय रेखा एका रोमँटिक गाण्याच्या शूटसाठी सेटवर पोहोचल्या आणि दिग्दर्शकाने अॅक्शन बोलताच विश्वजीतने रेखा यांना किस करायला सुरुवात केली. रेखा यांना याबाबतीत कल्पना नव्हती.  (anjana safar movie cast)

विश्वजीतने 5 मिनिटं रेखा यांना किस केलं. तेव्हा सेटवर असलेले सर्वजण टाळ्या वाजवत होते. पण रेखाच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहू लागले होते. उपस्थित असेलेला प्रत्येक जण पाहत राहिला, पण त्यांची दया कोणालाही आली नाही. 

 Source link

Leave a Reply