Headlines

“बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान | Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut ex cm slams rebel eknath shinde group ask them not to use his father balasaheb name scsg 91

[ad_1]

शिवसेनेतील बंडखोर गट मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. बंडखोरांचं खरोखर काही कर्तृत्व असेल तर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे फोटो लावून, त्यांना सभांमध्ये घेऊन जाऊन, भाषण ठोकून निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान उद्धव यांनी बंडखोर गटातील शिवसेना नेत्यांना केलं आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नक्की पाहा >> Video: “…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता”; गळ्यावरुन हात फिरवत जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

“त्यांची अशी योजना होती की बाळासाहेबांनंतर शिवसेना संपवायचा त्यांचा डाव होता पण तुम्ही शिवसेना उभी केली,” असं म्हणत राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता उद्धव यांनी भाजपावर टीका केली. भाजपाला स्वत:चे आदर्श निर्माण करता आले नाहीत, असा टोला उद्धव यांनी लगावला. “बाळासाहेबांनंतर शिवसेना उभी केली हेच त्यांच्या पोटात दुखतंय. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, सुभाष चंद्र बोस, बाळासाहेब हे स्वत:चे म्हणून लोकांसमोर आणायचे. आपल्याकडून काही आदर्श निर्माण नाही झाला तर पक्ष फोडतायत तसे आदर्श पळवायचे. ते आदर्श आपलेच म्हणून लोकांसमोर जायचं,” असा टोला उद्धव यांनी भाजपाला लगावला.

नक्की वाचा >> ‘खंजीर खुपसला’ टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये…”

पुढे उद्धव यांनी बंडखोरांना बाळासाहेबांच्या नावाचा आधार घेण्याशिवाय पर्याय यांनी असंही म्हटलंय. “बाळासाहेबांना त्यांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. नाही दिला तर लोक जोडे मारतील. कोणीही असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात बोलला तर लोक त्याला जोड्याने हाणतील. म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजे पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवाच. मात्र ते करताना माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागू नका,” असं उद्धव यांनी बंडखोरांना म्हटलंय.

पाहा मुलाखत –

नक्की पाहा >> Video: ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘हा’ शब्द उच्चारताच सभागृहात पिकला हशा

“प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडीलांबद्दल आदर आहे तसा प्रत्येकाला असला पाहिजे. त्यांनी स्वत:च्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावी. आज माझ्या दुर्देवाने माझे आई-वडील माझ्यासोबत नाहीत पण ते नेहमी माझ्यामध्ये आहेत. पण ज्यांचे ज्यांचे आई-वडील सुदैवाने त्यांच्यामध्ये आहेत त्यांना मी म्हणेन की असा आशीर्वाद पुन्हा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?” असा प्रश्न उद्धव यांनी बंडखोर शिंदे गटाला केलाय.

“माझ्या वडिलांच्या फोटोचा, नावाचा आधार घ्यावा लागतो याचा अर्थ काय की तुमच्यात कर्तृत्व नाही. तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाही आहात. तुम्ही विश्वासघातकी आहात. माझा तर विश्वासघात केला पण लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्या नावाने संभ्रम कशाला निर्माण करताय. तुमचा मर्दाचा चेहरा घ्या समोर आणि मागा मतं,” असंही उद्धव बंडखोरांबद्दल बोलताना म्हणालेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *