Headlines

Balasheb thorat criticized state Government over fuel price reduction spb 94

[ad_1]

राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकाच्या या निर्णयावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलची दर कपात ही केवळ जनतेची फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“ही केवळ जनतेची फसवणूक”

राज्यसरकारने डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी केले, हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूने विजेचे दर मात्र 20 टक्क्याने वाढवले आणि हे सांगायला ते जाणीवपूर्वक विसरले. एका बाजूने दिलासा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूने जाणीवपूर्वक लोकांच्या खिशातून पैसा काढून घ्यायचा. ही केवळ जनतेची फसवणूक असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

“महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम सुरू”

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला पण तो घेण्याआधी त्याचे फलित काय? हे तपासणे आवश्यक होते. हा निर्णय जेव्हा पूर्वी झाला तेव्हा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत व्यवस्थित चालते आहे का? हे जर त्यांनी तपासले असते तर हा निर्णय घेताना त्यांनी चारदा विचार केला असता, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

हेही वाचा – Petrol Diesel Price : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल प्रतिलिटर ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

“नगराध्यक्ष होण्याची तीही संधी मिळणार नाही”

शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा समाचार घेत बाळासाहेब थोरात म्हणाले की, ”जेव्हा सरपंच किंवा नगराध्यक्ष एका गटाचा आणि बहुमत दुसऱ्या गटाचे असे असेल तर तिथे कुठेही शांतता नाही असे आम्हाला बघायला मिळाले. नगरसेवकांना एक संधी असते की आपलं काम दाखवून नगराध्यक्ष होण्याची तीही संधी आता त्यांना मिळणार नाही.”

“…म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला”

मंत्रिमंडळ विस्तार गेल्या 15 दिवसांपासून रखडलेले आहे. कारण मंत्रिमंडळाबाबत त्यांच्यात आपआपसात वाद आहेत आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मुख्यमंत्री गडचिरोलीला गेले. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थितीमध्ये जवळपास ९० पर्यंत बळी गेलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा दुर्दैवाने या नव्या सरकारने घेतलेला दिसत नाही. कुठेही त्याबाबतीत जागृत दिसत नाही, मला वाटतं अजूनही त्यांनी दोघं असताना तरी पकड घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही, असेही ते म्हणाले.

“ते आमच्यासह जनतेला आवडलेले नाही”

शिवसेनेन यापूर्वी राष्ट्रपती उमेदवाराला पाठिंबा देताना वेगळे निर्णय घेतले आहेत. मात्र ज्या पद्धतीने असंवैधनिक गोष्टी वापरून सत्तांतर झाले. ज्या पद्धतीने भाजप काम करते आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे आता योग्य नाही. ज्यांनी सत्तेवरून काढलं त्यांना पाठिंबा देणे हे आमच्यासह जनतेला आवडलेले नाही, असेही ते म्हणाले.

“ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे”

राज्यघटना व लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि त्याकरता यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उभे केलेले आहे. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत ज्या पद्धतीने काम ते करतात ते पाहिल्यानंतर असं दिसत आहे की घटना, लोकशाही धोक्यात आहे. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ही लढाई एकत्रित लढत होतो, असेही थोरात म्हणाले.

हेही वाचा – इंधन दर कपातीवरून अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; म्हणाले, “हा तर राज्य सरकारचा…”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *