बाळासाहेबांचा दरारा आजही कायम; फोटोसमोर येण्याआधी सलमाननं काय केलं एकदा Video पाहाच


मुंबई :  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. आज बाळासाहेब आपल्यात नसले तरीही त्यांच्या नावाचा दरारा मात्र कायम आहे. बाळासाहेबांच्या नावाचा दरारा म्हणजे नेमकं काय हे नुकतंच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळालं. 

‘धर्मवीर’ या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं आयोजिक करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला नुकतीच सलमाननं हजेरी लावली होती. तिथं, व्यासपीठावर राजकारणातील बरीच मातब्बर मंडळी हजर होती. 

सलमानही व्यासपीठावर आला. तिथेच असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरेर आणि दिवंगत आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले होते. (Salman khan at Dhrmaveer movie event video)

ज्यावेळी सलमान छत्रपती शिवराय, बाळासाहेब यांच्या फोटोपुढं वंदन करण्यासाठी पुढे आला तेव्हा तिथं येण्याआधी त्यानं पायातील शूज काढून ठेवले आणि त्यानंतर पुढे येत या मंडळींपुढे तो नतमस्तक झाला. 

सलमानची ही कृती सर्वांचीच मनं जिंकून गेली आणि आजही या मंडळींच्या नावाचा असणारा दरारा पुन्हा एकदा सर्वांनाच अनुभवता आला. 

याच कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि इतरही बऱ्याच मंडळींची हजेरी होती. 

फक्त राजकीय मंडळीच नव्हे, तर या कार्यक्रमाच्या वेळी कलाकारांचीही हजेरी होती. अभिनेत्री भाग्यश्री, अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 

कट्टर शिवसैनिक दिवंगत नेते, आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर या ‘धर्मवीर’ या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. प्रदर्शनाआधीपासूनच या चित्रपटानं कमालीची उत्सुकता निर्माण केली असून, आता या साऱ्याचं कमाईच्या आकड्यांमध्ये रुपांतर होतं का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. Source link

Leave a Reply