बाळासाहेबांना का म्हणाले आनंद दिघे, ‘काय शिव्या द्यायच्या त्या द्या’; पण….


मुंबई : राजकारण हे माणसाला पूर्णपणे बदलणारं क्षेत्र आहे. विश्वास बसत नसेल तर या क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या कोणालाही तुम्ही ही बाब विचारू शकता. महाराष्ट्रानंही राजकारणाचा एक असा अध्याय पाहिला आहे, जिथं निस्वार्थ नाती- सलोखा आणि आपलेपणा राजकारणाहूनही वर्चस्व गाजवताना दिसला. (Dharmaveer Movie video)

हा अध्याय होता, ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या कारकिर्दीचा. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं दिघे यांच्या आयुष्यात असणारं स्थान आणि त्यांची या पक्षासाठी असणारी निष्ठा या साऱ्यावरच एका चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येत आहे. (Prasad oak)

‘धर्मवीर’ असंच या चित्रपटाचं नाव. अभिनेता प्रसाद ओक यानं यामध्ये आनंद दिघे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील आणखी एक महत्त्वाचा क्षण प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही, शिष्याचा दिवस आहे…. असं म्हणज थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर धडकलेल्या आनंद दिघेंनी कसा त्यांच्यावरच हक्क सांगितला होता हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

बाळासाहेबांचे पाय धुवून त्यांची पूजा करत आशीर्वाद घेणारे दिघे पाहून त्यांच्या समर्थकांनीही त्यांचाच आदर्श घेत या नेत्यामध्येच आपला विठ्ठल, अर्थात परमेश्वर पाहिला. 

तिथं दिघे बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी त्यांच्यासमोर उभे असतानाच इथे मात्र नकळतच दिघे यांच्यामध्ये असणारा देव त्यांच्या समर्थकांनी पाहिला आणि त्याची मनोभावे पूजा केली. 

माणसातलं देवपण म्हणजे नेमकं काय हे या व्हिडीओतून लगेचच लक्षात येत आहे. ‘ज्या शिव्या द्यायच्या आहेत त्या’….. असं बाळासाहेबांनाच म्हणणाऱ्या दिघेंना पाहताना एकेकाळी शिवसेना आणि त्यात सक्रीय असणारे नेते पक्षाप्रती किती समर्पक होते हेसुद्धा स्पष्ट होत आहे. 

काळ बदलला, दिवस आणि नेतेही बदलले. पण, शिवसेना- बाळासाहेब आणि आनंद दिघे हे समीकरण मात्र आजही बदलू शकलेलं नाही, हेच हा व्हिडीओ अधोरेखित करत आहे. Source link

Leave a Reply