Headlines

balasaheb thorat criticized shinde fadnavis government on fund distribution spb 94

[ad_1]

शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. राज्य सरकार या निर्णयांचे पुनरावलोकन करणार असून त्यानंतर या कामांना निधी दिला जाईल, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही अनेक महत्त्वाच्या कामांसाठी निधी रोखून ठेवला असल्याने आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने विशेषत: विरोधी पक्षांच्या आमदारांचा निधी रोखून धरला आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एक कंपनी गेली तरी…”

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

“निधी हा विषय फार महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने निधी थांबवल्यामुळे संपूर्ण राज्यातली कामे ठप्प आहेत. विशेष म्हणजे पावसामुळे जी रस्त्यांची कामे होणे आता आवश्यक आहे, ती पण बंद आहे. विशेषत: राज्य सरकारने विरोधी पक्षांच्या आमदारांचा निधी रोखून धरला आहे”, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “असा प्रकल्प निसटलाच…”

यावेळी बोलताना त्यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला होणाऱ्या विलंबावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. “काही निर्णय राज्य सरकारने त्वरीत घेतले पाहिजे. आधी मंत्री मिळत नव्हते, नंतर खातेवाटपाला उशीर आणि आता पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला उशील होणं, हे योग्य नाही. प्रत्येक दिवस आणि दिवसाचा प्रत्येक तास महत्त्वाच असतो”, असेही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *