Headlines

“बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाईन तीच खरी शिवसेना” ठाकरे कुटुंबातील सदस्याचे वक्तव्य | nihar thackeray said real Shiv Sena will carry Balasaheb thackeray thoughts forward after meeting to eknath shinde

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. असे असताना ठाकरे कुटुंबातील सदस्य असलेले उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई निहार ठाकरे यांनी शुक्रवारी (२९ जुलै) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर निहार ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारीच खरी शिवसेना आहे, असे विधान केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा जलील यांचा इशारा, शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले…

“मी राजकारणात आलेलो नाही. जी कायदेशीर मदत लागेल ती मी एकनाथ शिंदे यांना देणार आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाईन तीच खरी शिवसेना आहे. मी देवेंद्र फडणवीस यांनादेखील भेटलो आहे. त्यांनादेखील मी शुभेच्छा दिल्या आहेत. मी राजकारणात येत नाहीये,” असे निहार ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “…मला चिंता वाटतेय” न्यायालयाच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचे विधान

“मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो होतो. बाळासाहेब ठेकरे यांचा तसेच हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जायला हवा, असे मला वाटते. याच कारणामुळे मी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आपलचे नेते आहेत. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री इथपर्यंत ते आले आहेत,” असे निहार ठाकरे म्हणाले. तसेच, शिवसेनेला आव्हानं नवी नाहीयेत. एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जातील, असा विश्वासही निहार ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> “मी ज्योतिषी नाही, पण निवडणुका…” विरोधकांच्या ‘त्या’ दाव्यावर शरद पवार यांचे महत्त्वाचे विधान

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी काही दिसवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई निहार ठाकरे यांनीदेखील शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी मी राजकारणात येणार नसल्याचे सांगितले असले तरी, आगामी काळात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *