बाळाच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा मोठा निर्णय; थेट Video पोस्ट केल्यामुळं चाहतेही अवाक्


मुंबई : बाळाचा जन्म हा एखाद्या महिलेचं आयुष्य 360 अंशांनी बदलून जातो. तिच्या जगण्यात काही असे बदल होतात जे तिच्यासाठीच अगदी नवे असतात. त्यामुळं जसजसं बाळ मोठं होत असतं, या विश्वात स्थिरावत असतं तसतशी त्याला जन्म देणारी मातासुद्धा नव्यानं जगायला शिकत असते. 

आव्हानं कमी नसली तरीही एक- एक आव्हान पायाखाली चिरडत त्यावर मात करत ती पुढे जात असते. तिचं पुढे जाणं अनेकांना प्रेरणा देतं. सध्या अशीच प्रेरणा देत आहे एक टेलिव्हिजन अभिनेत्री. 

नृत्यक्षेत्रात नाव कमावल्यानंतर अभिनय जगताकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे, मोहिना कुमारी सिंह. शाही कुटुंबात जन्मलेल्या मोहिनानं तिची ही ओळख मागे ठेवत कलाजगतामध्ये आपलं वेगळं स्थान प्रस्थापित केलं. सुयश रावत याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर मोहिनानं अभिनय जगताला रामराम ठोकला. (Actress dancer Mohena Kumari Singh resumed her katthak practice)

कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या या अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला. त्याच्या जन्मानंतर मोहिना नव्या रुपानं जगासमोर आली. पण, इथवरच न थांबता तिनं आपली वाट पुन्हा एकदा नृत्याच्या दिशेनं वळवली आहे. 

इन्स्टाग्रामवर मोहिनानं नुकतीच एक पोस्ट शेअर करत आपण पुन्हा एकदा कथ्थकचा सराव सुरु केल्याचं सांगितलं. 

‘कथ्थक माझ्यासाठी मन आणि आत्मा आहे. मी पुन्हा हा सुरेख प्रवास सुरु करतेय’, असं लिहिताना एखाद्या नवख्या विद्यार्थ्याच्या मनात असणारी भीती तिनंही व्यक्त केली आहे. आत्मविश्वास काहीसा कमी असला तरीही तो डगमगलेला नाही, असं सांगताना तिच्या मनात असणारं लहान मूल नकळत डोकावताना नेटकऱ्यांना दिसत आहे. सुरेख अशा या कॅप्शनला मोहिनानं तितकंच सुरेख अशा नृत्याच्या व्हिडीओची जोडही दिली आहे. तिचा हा व्हिडीओ आणि नृत्यमृद्रा पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. Source link

Leave a Reply