बाळाच्या जन्मासाठी आतुर असणाऱ्या रणबीर- आलियाच्या संपत्तीचा आकडा भांबावून सोडेल


मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) या जोडीनं त्यांच्या नात्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा सर्वांच्या भेटीला आणला. आलिया आणि रणबीरच्या वैवाहिक आयुष्यात आता एका खास व्यक्तीची एंट्री होणार आहे. ही खास व्यक्ती म्हणजे त्यांचं बाळ. (Bollywood Actress alia Bhatt Pregnant ranbir kapoor and wifes net worth)

आलिया गरोदर असल्यामुळं सध्या तिच्यावर आणि संपूर्ण कुटुंबावरच शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. येणाऱ्या बाळासाठी भट्ट आणि कपूर कुटुंबसमवेत चाहतेही प्रचंड आनंदात आहेत. 

तुम्हाला माहितीये का, हे बाळ जन्मण्याच्या आधीच चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्ही ‘चांदीचा चमचा तोंडात घेऊन येणे’ हा वाक् प्रचार ऐकला असेल. रणबीर आणि आलियाच्या बाळाच्या बाबतीतत ते खरं होणार आहे. 

कारण, आई- वडिलांच्या आणि कुटुंबाच्या श्रीमंतीनं त्याचं आयुष्य परिपूर्ण होणार आहे. रणबीर आणि आलिया या दोघांचीही एकंदर कारकिर्द पाहता या जोडीच्या कमाईचा आकडा थक्क करणारा आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार रणबीरकडे जवळपास 322 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर आलियाच्या संपत्तीचा आकडा 162 रुपयांवर आहे. 

आलिया एका चित्रपटासाठी जवळपास 15 कोटी रुपयांचं मानधन आकारते. शिवाय जाहिरातीसुद्धा ती 2 कोटी रुपयांचं मानधन आकारते. मुंबईत आलियाची 2 घरं आहेत. तर, लंडनमध्ये तिचं एक घर आहे.

अभिनयासोबतच आलिया निर्मिती, क्लोथिंग ब्रँड या व्यवसायांमध्येही सक्रिय आहे. तिच्याकडे ऑडी क्यू 7, ऑडी क्यू  5, ऑडी क्यू 6, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, लँड रोवर, रेंज रोवर अशा कार आहेत. 

रणबीरही त्याच्या चित्रपटांसाठी 40 ते 50 कोटी रुपये इतकं मानधन घेतो. जाहिरातींच्या माध्यमातूनही तो तगडी कमाई करतो. एका जाहिरातीसाठी रणबीर साधारण 6 कोटी रुपये इतकं मानधन घेतो. रेंज रोवर, वोग, ऑडी आर 8, मर्सिडीज जी 63 एएमजी, ऑडी ए8एल, रेंज रोवर अशा कारची मालकी त्याच्याकडे आहे.  . Source link

Leave a Reply