बाबो! चिरतरूण दिसण्यासाठी तब्बूने केलं हे कृत्य, 50 हजार देऊन…


Tabu : प्रत्येकजण स्मार्ट आणि तरूण दिसण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतो. चित्रपटसृष्टीत तर ही गोष्ट सर्रास दिसून येते. अनेक अभिनेत्या चाळीशी पार केल्यानंतर देखील विशीतल्या दिसतात. तरूण दिसण्यासाठी त्या खूप मेहनत देखील घेतात. यामध्ये स्टार अभिनेत्री तब्बूचा (Bollywood Actress Tabu) देखील समावेश आहे. (Tabu had bought a cream worth 50 thousand to look younger)

आज 50 वर्षांची झालेली तब्बू चित्रपटात चांगलं काम करताना दिसते. गेल्या तीन दशकापासून बॉलिवूडमध्ये तब्बूचा दबदबा कायम आहे. तिच्या टॅलेंटशिवाय तिच्या सुंदरतेसाठी देखील तब्बू ओळखली जाते. अशातच आता एका इंटरव्यूमध्ये तब्बूने मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाली तब्बू?

फिल्म कॅम्पेनियनसोबत झालेल्या मुलाखतीमध्ये (Interview with Tabu) तब्बूने तिच्या सौंदर्याविषयी खुलासा केला. असं कोणतंच खास रुटीन नाही, ज्याला ती फॉलो करते. मला माझ्या इमेजची पुर्ण कल्पना असते आणि टिकवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करते, असं तब्बू म्हणाली. त्यानंतर तब्बूला दिवसेंदिवस तरूण दिसण्याचं सिक्रेट विचारण्यात आलं.

असं काही खास सिक्रेट (Makeup secret) नाही, असं तब्बू म्हणाली. त्यावेळी तिने मेकअप आर्टिस्टचा देखील किस्सा सांगितला. माझी मेकअप आर्टिस्टने मला विचारलं होतं की, मॅम तुमची त्वचा खुप चांगली दिसत आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी काय करता?, त्यावर तब्बूने काही खास नाही, असं उत्तर दिलं. त्यावर तिने कोणती तरी क्रिम वापरण्याचा सल्ला दिला.

मेकअप आर्टिस्टने सुचवलेल्या क्रिमची किंमत 50 हजार होती. फक्त एकवेळा मी खरेदी केली. त्यानंतर कधीच नाही, असं तब्बू म्हणाली. असं काही खास मी माझ्या चेहऱ्यासाठी करत नाही. मला सतत एकसारखं दिसायचंय, हे मला माहिती आहे. त्यासाठी मी प्रयत्न करते, असं तब्बूने सांगितलं.

दरम्यान, ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बू प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता ‘खुफिया’ नावाच्या चित्रपटात तब्बू काम करत आहे.Source link

Leave a Reply