Headlines

‘बबिताजींनी पाहिलं असतं तर…’, जेठालालचा हा Unseen Photo पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

[ad_1]

Dilip Joshi Unseen Photo : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी तर सगळ्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर काही फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये दिलीप जोशी यांना ओळखता येत नाही आहे.  

दिलीप जोशी यांनी हा फोटो ऑगस्ट 2020 साली शेअर केला होता. या फोटोमध्ये दिलीप जोशी यांना ओळखता येत नाही. या फोटोत ‘कोणीतरी मला सांगितले की इन्स्टाग्रामवर थ्रोबॅक गुरुवार नावाची काही गोष्ट आहे, तर तुम्ही हे घ्या. 1983, जुहू येथील सगळ्यात जुन्या पृथ्वी थिएटरची ग्रीन रूम. आमच्या ‘खेलेया’ नाटकाच्या अगदी आधी हा फोटो क्लिक केला होता. संपूर्ण कलाकार आणि क्रू मेंबर्स चंदू भाई, परेश भाई आणि महेंद्र जोशी यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली होती. या सगळ्या आठवणी आता आठवतात. 

दिलीप जोशी यांचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट म्हणाला, तू पहिल्या फोटोत सलमान खानसारखा दिसत आहेस. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तरुणपणी बबिताजीनं तुम्हाला पाहिलं असतं तर आश्चर्यचकीत झाल्या असत्या. दुसरा नेटकरी म्हणाला, आधी डाकू वगैरे होतास की काय? आणखी एक नेटकरी म्हणाला, सर, तुम्ही कोणत्या चित्रपटात डाकूची भूमिका साकारली होती? 

हेही वाचा : Sushant Singh Rajput Birthday: शेवटच्या दिवसात सुशांतची अशी होती अवस्था, Video आला समोर

दिलीप जोशी यांच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर ते 1989 पासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी 1989 साली प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. याशिवाय ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ आणि ‘हम आपके है कौन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.  दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून दिलीप जोशी यांना लोकप्रियता मिळाली. या मालिकेत दिलीप जोशी 2008 पासून सक्रिय आहेत. 

दिलीप जोशी हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. दिलीप जोशी एका एपिसोडसाठी 1.50 लाख रुपये मानधन म्हणून घेतात, असे म्हटले जाते. दिलीप जोशी यांनी 
आतापर्यंत छोट्या पडद्यावरील ‘दाल में काला’, ‘रिश्ते: द लव्ह स्टोरीज’, ‘हम सब बाराती’, ‘एफआयआर’ आणि ‘अगड़म बगड़म तिगड़म’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *