बबिता जीचा 18 वर्षापूर्वीचा हा फोटो होतोय व्हायरल, फोटोला 1 लाखाहून अधिक लाईक्स


मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा (taarak mehta ka ooltah chashmah) हा शो गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. त्यामुळेच तो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये. जेठालाल, दयाबेन पासून ते पोपटलाल पर्यंत या शोमधील प्रत्येक पात्र तितकेच खास आहेत. पण यामध्ये सर्वात खास पात्र आहे ते म्हणजे मुनमुन दत्ता उर्फ ​​बबिता जी. 

बबिता जीच्या (Babita Ji) अभिनयावरच नाही तर ग्लॅमर लूकवरही लोकं प्रेम करतात. सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केलाय. आता अलीकडेच, अभिनेत्रीने तिचा 18 वर्षांपूर्वीचा एक जुना फोटो शेअर केला आहे, जो पाहून तुम्ही तिला ओळखू शकणार नाही.

आपल्या 18 वर्षांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मुनमुन दत्ताने लिहिते की, ‘सर्कस 2004… हम सब बाराती है. 

तारक मेहता का उल्टा चष्माची बबिता जी उर्फ ​​मुनमुन दत्ता हिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. हा फोटो 18 वर्ष जुना मुनमुन दत्ताचा आहे आणि तिच्या पहिल्या शोचे आहे. मुनमुन दत्ताने 2004 साली ‘हम सब बाराती’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ज्याची एक झलक तिने चाहत्यांना दाखवली. पहिल्या फोटोत ती साध्या निळ्या रंगाच्या टॉप मध्ये अभिनेता श्री दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांच्या सोबत दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती लाल लेहेंगा-चोलीत अतिशय हॉट दिसत आहे.

मुनमुन दत्ताचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुझ्या अभिनयाला उत्तर नाही’. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘सिझलिंग’. आणखी एका युजरने लिहिले, ‘यंग, स्लिम आणि क्यूट’. तिच्या या व्हायरल फोटोला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मुनमुन दत्ता खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. ती सुरुवातीपासून किती फिटनेस फ्रिक होती याचा अंदाज तिच्या 18 वर्षांच्या फोटोंवरून येऊ शकतो. मुनमुन दत्ताच्या फोटोंवर सोशल मीडियावर लोकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला, मग ती पारंपारिक असो किंवा बोल्ड स्टाइल, ती तिच्या प्रत्येक कृतीने लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवते.Source link

Leave a Reply