Babar Azam Video: बेडरूम व्हिडिओ Leak झाल्यानंतर बाबर आझमचं पहिलं ट्विट, म्हणाला…


Babar Azam Pakistan: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) गेल्या काही काळापासून त्याच्या फ्लॉप शोमुळे चर्चेत आहे. अशातच बाबर एका नव्या अडचणीत सापडल्याचं पहायला मिळतंय. बाबर आझमवर संघातील सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला जात असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता बाबर आझमचा व्हिडिओ (Babar Azam pictures Photo Video leaked) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे तो हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकला का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. (babar azam sexting scandal private video photos pakistan captain babar tweet troll marathi news)

नेमकं काय घडलं? 

पाकिस्तानचा विराट कोहली (Virat Kohli) म्हणून ओळखला जाणाऱ्या बाबर आझमवर फसवणूक (Serious allegation on Babar Azam) केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. इन्स्टाग्रामवरील ईशा राजपूत (Isha Rajput) नावाच्या हँडलवर फोटो आणि व्हिडीओ (Babar Azam Chat Video) शेअर केले आहेत. त्यात दिसणारी व्यक्ती पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम असल्याचा दावा करण्यात आलाय.

काही चॅट्स आणि व्हिडिओच्या आधारे हे आरोप केले जात आहेत. सध्या तरी या आरोपांवर बाबर आझमकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण (Babar Azam clarification) आलेलं नाही. त्यामुळे बाबरच्या उत्तराची सर्वजण वाट पाहत आहेत. हे सर्व प्रकरण सुरू असताना आता बाबर आझमने एक ट्विट (abar Azam Tweet) केलं आहे. 

बाबर आझमच्या व्हिडिओची चर्चा होत असताना बाबरने एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बाबर युरोपातील समुद्र किनाऱ्यावर बसल्याचं दिसतंय. पांढरा टी शर्ट, डोळ्यावर काळा गॉगल आणि स्टायलिश बूट घातल्याचं दिसतंय. त्यावर त्याने, आनंदी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, असं कॅप्शन दिलंय. 

आणखी वाचा – Babar Azam हनी ट्रॅपमध्ये अडकला? बेडरूमधील पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल

दरम्यान, नोव्हेंबर 2020 मध्ये एका महिलेने बाबर आझमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. बाबरने तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं होतं आणि या वचनाच्या आधारे त्यानं 10 वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, या महिलेने दावा केलाय. बाबर कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने हा आरोप केला आहे. बाबरला या आरोपातून क्लीन चिट मिळाली आहे. त्यानंतर आता बाबर नव्या संकटात सापडला आहे.Source link

Leave a Reply