Headlines

‘बाप बाप होता है’ वीरुच्या त्या कमेंटवर भडकला शोएब अख्तर, म्हणाला…

[ad_1]

Asia Cup : एशिया कप स्पर्धेत रविवारी रंगलेल्या सामन्या भारताने पाकिस्तानचा (India vs Pakistan) पराभव केला.  शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना चुरशीचा ठरला. पण त्याचवेळी मैदानाबाहेर आणखी एक सामना रंगला, ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली. 

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Stadium) रंगलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) एका भारतीय पत्रकारावर चांगलाच भडकला. या पत्रकाराने शोएब अख्तरला ‘बाप बाप होता है’ या कमेंटवर प्रश्न विचारला. भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) भारत-पाकिस्तानदरम्यानच्या एका सामन्यात हे वक्तव्य केलं होतं. 

सेहवागने अनेक मुलाखतीत हा किस्सा सांगितलाय. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यात सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सिक्स लगावल्यानंतर सेहवागने म्हटलं होतं ‘बाप बाप होता  है और बेटा बेटा’. भारतीय पत्रकाराने या वक्तव्याची आठवण शोएब अख्तरला करुन दिली. यावर शोएब चांगलाच संतापला. सेहवानने आपल्यासमोर असं कोणतंही वक्तव्य केलं नाही, आणि असा जर तो बोलला असता तर त्याचं काही खरं नव्हतं असं शोएबने म्हटलं आहे.

शोएब म्हणाला, वीरेंद्र सेहवागने माझ्या तोंडावर हे वक्तव्य केलं असतं तर तो वाचला नसता. त्यामुळे मला माहित नाही की त्याने हे वक्तव्य कुठे आणि केव्हा केलं. मी स्वत: एकदा त्याला याबाबत विचारलं, पण त्याने उत्तर देणं टाळलं, असं शोएब अख्तरने म्हटलंय. 

मी सर्वांचा आदर करतो.भारतातही माझा मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळे दोन देशांतील अंतर वाढेल असं वक्तव्य करणं मी टाळतो असंही शोएबने स्प्टष्ट केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *