आयुष्य नर्क झालं… मलायकासोबतच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा बोलला अर्जुन


मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील कायमच चर्चेत असलेली जोडी आहे. मलायका एका मुलाची आई आहे. मलायकाने अरबाजकडून घटस्फोट घेतला आहे. असं असलं तरीही आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुनला मलायका डेट करतेय. 

मलायका आणि अर्जुनने सगळ्या सीमा पारकडून एकमेकांचं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे. आज व्हॅलेंटाईन डे… प्रेमाचा दिवस… असं असताना अर्जुनने पहिल्यांदाच जगासमोर मलायका आणि त्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

अर्जुनला त्याच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ते दोघं एकमेकांच्या कठिण काळात कायमच सोबत असतात, असं विचारण्यात आलं. यावेळी अर्जुन म्हणाला की, ‘हो आम्ही एकमेकांच्या कठिण काळात सोबत असतो. ‘

सोशल मीडियामुळे खूप गोष्टी गढूळ झाल्या होता. अनेक संकट, वेगवेगळी कारण आणि प्रश्न आमच्या नात्यावर विचारण्यात आली. पण या सगळ्या कठिण प्रसंगात आम्ही सोबतच होतो. 

अर्जुन पुढे म्हणतो की, अनेक दिवस आमचं आयुष्य नर्क होतं. पण असं असलं तरीही आम्ही एकत्र समोर आलो. मलायकाला बरंच काही ऐकावं लागलं. पण तीने ते सहन केलं. म्हणून मला तिचं कौतुक आहे. मी तिचा आदर करतो. मलायकासोबत उभं राहिल्यामुळे मला कधीच वेगळं आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटलं नाही. 

पुढे अर्जुन म्हणतो की, मला पण असं वाटलं की, मी देखील सत्यासोबत आहे. मी अतिशय सामान्य गोष्ट करत आहे. मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. 

या दोघांनी जगासमोर येऊन आपलं नातं स्वीकारलं आहे. आता हे दोघं कधी लग्न करणार आहेत. याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. Source link

Leave a Reply