आयला जुडवा! सेम हेअरस्टाईल, सेम शर्ट… विराट कोहली आणि बाबर आझमचा लहानपणीचा फोटो व्हायरल


Babar Azam and Virat Kohli Child: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची नेहमीच तुलना केली जाते. कधी त्यांनी केलेल्या कामगिरीवरुन तर कधी त्यांच्या फलंदाजीवरुन. पण यावेळी विराट कोहली आणि बाबर आझमची तुलना एका वेगळ्याच कारणाने होत आहे. त्यांची हेअरस्टाईल आणि कपड्यांवरुन विराट कोहली आणि बाबर आझम चर्चेत आले आहेत. 

कोहली आणि बाबरचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियार चांगलाच व्हायरल होत आहे. साधारण दोघंही आठ ते दहा वर्षांचे असतानाचा हा फोटो आहे. या फोटात दोघांचे कपडे आणि दोघांची हेअरस्टाईल अगदी सेम टू सेम आहे. दोघांची चेहरेपट्टी वेगळी असली तरी दोघांची फॅशन मात्र सारखीच आहे. 

व्हायरल होणाऱ्या या फोटात (Viral Photo) दोघांनी घातलेला शर्ट साधारण सारखाच दिसत आहे. दोघांनीही चौकटीचा शर्ट घातल्याचं दिसतंय. तर दोघांची हेअरस्टाईलही सारखीच आहे. दोघांचे देश वेगळे असले तरी रहाण्याची पद्धत मात्र सारखीच दिसतेय. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर चाहत्यांनी लहानपणी दोघंही अगदी हुबेहुब दिसत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

विशेष म्हणजे हेअरस्टाईल आणि कपड्यांची स्टाईल सारखीच असणाऱ्या विराट आणि बाबरची मोठेपणी आवडही एकच आहे ती म्हणजे क्रिकेट. दोघंही क्रिकेट जगतातील सध्याचे स्टार फलंदाज आहेत. दोघांचं खेळण्याचं तंत्रज्ञान आणि रेकॉर्ड करण्याची इच्छाशक्तीही सारखीच आहे. याच कारणामुळे दोघांची नेहमीच तुलना होत असते. 

विराट कोहलीचा रेकॉर्ड
33 वर्षांच्या विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण (Internation Debut) केलं होतं. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तब्बल 71 शतकं जमा आहेत. सर्धाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर विराटचा नंबर लागतो. तर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.

बाबर आझमाच रेकॉर्ड
तर 27 वर्षीय बाबर आझमने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आज तो पाकिस्तानचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळकला जातो. क्रिकेटच्या तिनही फॉर्मेटमध्ये टॉप 10 फलंदाजांच्या यादीत बाबर आझमचं स्थान आहे. 

विराट कोहली आणि बाबर आझम एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) आमने सामने आले होते. आता पुन्हा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) स्पर्धेत दोघांमध्ये चुरस असेल.Source link

Leave a Reply