दडशिंगेत कॅन्सर विषयी जनजागृती शिबीर

बार्शी/प्रतिंनिधी – लायन्स क्लब बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारा बाबत जनजागृती करण्यासाठी कॅन्सर अवेअरनेस शिबिर आयोजित केले होते .यावेळी कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट बार्शी येथील कॅन्सर प्रतिबंध व लसीकरण विभाग प्रमुख संजयजी हिंगमिरे , लायन्स क्लब चे अध्यक्ष ऍड विकास जाधव , क्लब चे झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी, गिरीश शेटे सरपंच सचिन गोसावी उपसरपंच विलास पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष, माजी उपसरपंच पांडुरंग घोलप यांच्या सह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लब च्या वतीने 10 कुटूंबास 100 किलो तांदळाचे वाटप ग्रामपंचायत कार्यालयात गरजू लोकांना वाटप करण्यात आले. स्मशान भूमीत स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ केला.

लायन्स क्लब बार्शी च्या वतीने सातत्याने आरोग्य, पर्यावरण, शिक्षण व धान्य वाटप अशा विषयांवर काम सुरू आहे.दडशिंगे हे गाव दत्तक गाव असल्याने या गावावर विषेश लक्ष दिले आहे असे अध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी सांगितले, संजय हिंगमिरे यांनी कॅन्सर प्रतिबंध करण्यासाठी काय काळजी घ्यावी या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नंदकुमार कल्याणी गिरीश शेटे, यांनी मार्गदर्शन केले सुत्रसंचलन पांडुरंग घोलप यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन गोसावी यांनी मानले.

Leave a Reply