भीषण अपघातानंतर ‘Avenger’ फेम अभिनेत्याची अवस्था वाईट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल


Avengers Fame Actor Jeremy Renner Accident : अ‍ॅव्हेंजर (Avengers) या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांना आपण मोठ-मोठे आणि त्यासोबतच खतरनाक स्टंट केल्याचे पाहिले. या लोकप्रिय चित्रपटात हॉकआयची भूमिका साकारणारा अभिनेता जेरेमी रेनरचा (Jeremy Renner) काही दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला होता. त्या भीषण अपघातानंतर जेरेमीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले होते. या वेळी त्यानं हा खुलासा केला ही त्याची 30 पेक्षा जास्त हाडे मोडली आहेत. 

जेरेमी रेनरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जेरेमी हा रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. यावेळी तो कोणाच्या तरी मदतीनं स्ट्रेचिंग वर्क आऊट करताना दिसत आहे. 

(Jeremy Renner Social Media Post) हा फोटो शेअर करत ‘सकाळचं वर्क आऊट, यंदाच्या वर्षी ज्या गोष्टी रोज करणार हे ठरवलेलं ते सगळे इथेच थांबले…, सगळं बदललं आहे…, माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी हा वाईट काळ आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी ज्यांनी प्रार्थना केली आणि मेसेज करत आम्हाला आधार दिला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतोय…  ही 30 पेक्षा जास्त तुटलेली हाडं जुळतील, मजबूत होतील, जसं तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलयं. यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार…’ असे कॅप्शन जेरेमीनं दिले आहे. (Jeremy Renner Accident) 

हेही वाचा : Hrithik Roshan and Saba Azad Love Story : ‘सोशल मीडियाने बना दी जोडी’ हृतिक आणि सबाची प्यारवाली लव्ह स्टोरी!

अ‍ॅव्हेंजर्सचे जेरेमीचे सह-कलाकार ख्रिस हेम्सवर्थ (Chris Hemsworth) आणि ख्रिस इव्हान्स यांनीही त्याच्या फोटोवर कमेंट करत ख्रिस हेम्सवर्थ म्हणाला, तू चॅम्पियन आहेस मित्रा! आमचं तुझ्यावर प्रेम आहे. तर ख्रिस इव्हान्स (Chris Evans) विनोद करत म्हणाला कुणी स्नोकॅट ठीक आहे की नाही ते तपासले की नाही? 

जेरेमीचा अपघात कसा झाला? (How Jeremy Renner’s Accident Happend?)

जेरेमी रेनरचा अपघात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाला. हा अपघात त्याच्या घराजवळ झाला होता. अपघातानंतर त्याला दोन आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या बुधवारी त्याला रुग्णालयातून घरी आणले. सध्या घरातच त्याच्यावर उपचार होणार आहेत. जेरेमी रेनरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी कमेंट करत ते जेरेमीसाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. Source link

Leave a Reply