Headlines

स्वतःच्याच पायावर मारला धोंडा; सामना हरल्यावर धोनीने मान्य केली चूक

[ad_1]

मुंबई : प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जला रविवारच्या सामन्यात पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. गुजरात टायटन्स विरूद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईचा सात विकेट्सने दारूण पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चुकीचा निर्णय घेतल्याची कबूली दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो टीमसाठी चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला 134 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने टीमसाठी 53 रन्सची उत्तम खेळी खेळली.

सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला, बॉल बॅटवर येत नसल्याने प्रथम फलंदाजी करणं हा अजिबात योग्य निर्णय नव्हता. त्यामुळे फलंदाजांची अडचण झाली. तर दुसऱ्या डावात बॉल सहज बॅटवर येत होता.

धोनी पुढे म्हणाला, साईने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. आम्ही शिवमलावरच्या क्रमांकावर पाठवू शकलो असतो, पण आमचा प्रयत्न असा होता की जगदीशनला जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवायला मिळावा.

एमएस धोनीने प्रथमच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या श्रीलंकेचा गोलंदाज मथिशालपथीरानाचेही कौतुक केलंय. धोनी म्हणाला की, तो चांगला गोलंदाज आहे, काही प्रमाणात तो लसिथ मलिंगासारखा आहे. त्याच्याकडे ज्या प्रकारची शैली आहे, त्याच्याकडून चूक होण्याची शक्यता आहे, परंतु त्याने चांगली गोलंदाजी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *