Headlines

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कारी / प्रतिनिधी- ( आसिफ मुलाणी ) – ८० टक्के नुकसानी पोटी सोयाबीन पिक विमा द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल (दि१०) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.


सकाळी १०वाजल्यापासूनच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा झाले होते. जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी पोलिसांना चकवा देत वेषांतर करत बुरखा घालून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी घोषणा देत बाटली मध्ये सोबत आणलेले डिझेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ८०% पीकविमा मिळालाच पाहिजे,आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, विमा कंपनीचे टेंडर रद्द झालेच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.

वेषांतर करत बुरखा परिधान केलेले – जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव


यामध्ये युवा जिल्हाध्यक्ष विनायक ढेंबरे , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजित डोके, तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, वैभव डोके, विजयसिंह विधाते, परिक्षीत विधाते, पुष्पराज यादव, तुषार माने, मनोज जाधव, प्रविण डोके, सुधाकर गायकवाड, गजानन लाटे, जगदीश डोके, चंद्रकांत घाडगे, बबलू जाधव, महेश घावटे यांच्यासह शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply