Headlines

ATM मधून काढलेल्या नोटा देखील असू शकतात बनावट, पैसे काढायला गेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

[ad_1]

मुंबई : पैसे काढण्यासाठी लोक सर्वात जास्त वापरत असलेली गोष्ट म्हणडे एटीएम. यासाठी आपण बँकेत न जाता, कोणत्याही ठिकाणाहून अगदी कधीही पैसे काढू शकतो. ज्यामुळे लोकांना याचा खुप फायदा होत आहे. परंतु याच्या माध्यमातूनच अनेक फ्रॉड होत असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी व्यवहार करताना सांभाळून राहावं.

एटीएममधून काही भामटे पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळा मार्ग वापरता आणि ते असे मार्ग असताता, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. त्यातच आता बनावट नोटांचे देखील प्रमाण वाढलं आहे. मोठमोठ्या शहरात या बनावट नोटांचा वापर अगदी सरास होत आहे.

सध्या बाजारात 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटांचा वापर होत आहे. खरेतर हे बनावट नोटा दररोजच्या वापरात आणण्यासाठी छोट्या दुकानांना टार्गेट केलं जातं. कारण जर मोठ्या दुकारनदरांना खऱ्या आणि खोट्याची जास्त ओळख असते. तसेच मोठे दुकानदार व्यवहार करताना जास्त काळजी घेतात, त्यामुळे छोटे दुकानदार हे सोपं टार्गेट या भामट्यांना मिळतं.

भोपाळच्या खरगोन शहरात एका तरुण या बनावट नोटांना बळी पडला. देवेंद्र पंगेसिंग सिंगा असे या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या वडिलांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला. येथून त्याने 25 हजार रुपये काढले, ज्यामध्ये त्याला 500 च्या 50 नोटा मिळाल्या यापैकी 4 नोटा वेगळ्या प्रकारच्या होत्या. त्यांचा कागद हलका आहे. तसेच छपाई देखील बरोबर झालेली नव्हती. ज्यानंतर त्याने या घटनेबद्दल पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

खरेतर सध्या बाजारात अनेक बनावट नोटा आहेत. त्यामुळे आपण देखील कोणाकडून नोट घेताना तिला निट पारखून घेतो. परंतु तरीदेखील बऱ्याचदा अपूऱ्या माहितीमुळे लोकांना खऱ्या खोट्याचा अंदाज लावता येत नाही, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या नोटांची ओळख कशी करायची हे सांगणार आहोत.

200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरील अंक हे रंग बदलणाऱ्या शाईने लिहिलेले असते. म्हणजेच जेव्हा नोट तुम्ही आडवी धरात तेव्हा या अंकांचा रंग हिरवा दिसतो, परंतु जेव्हा तुम्ही नोटीला थोडी वाकडी कराल तेव्हा तुम्हाला ते अंक निळ्या रंगाचे दिसतात. अशी जर नोटची ओळख पटली तर ती नोट खरी आहे.

500 ची नोट दिव्यासमोर किंवा लाईट सोमर धरलीत आणि तिला तुच्या डोळ्यांच्या  45 अंशाच्या कोनात ठेवलीत तर तुम्हाला त्या नोटीवर 500 लिहिले दिसेल. येथे देवनागरीत 500 लिहिले आहे. तसेच जर तुम्ही नोट थोडीशी वाकडी केली, तर तुम्हाला नोटीवरील सिक्योरिटी थ्रेड हिरव्याचा निळा दिसू लागतो.

तसेच 500 च्या नोटेवर ती छापण्याचे वर्ष लिहिले आहे. मध्यभागी भाषा फलक आहे. तसेच स्वच्छ भारताचा लोगो स्लोगनसह छापण्यात आला आहे.

– बँकेच्या 10, 20 आणि 50 मूल्यांच्या नोटांच्या पुढील बाजूस चांदीच्या रंगाचा वाचण्यायोग्य सुरक्षा धागा आहे. हा सुरक्षा धागा अतिनील प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर पिवळ्या रंगाचा दिसतो. प्रकाशाच्या विरुद्ध ठेवल्यावर तो सरळ रेषेत दिसतो.

-100 रुपयांची मूळ नवीन नोट ओळखण्याचा पहिला मार्ग म्हणजे मूळ नोटेच्या पुढील दोन्ही बाजूला देवनागरीमध्ये 100 लिहिलेले आहे. नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो आहे. तसेच, 100 रुपयांच्या मूळ नोटेवर RBI, भारत, INDIA आणि 100 हे छोट्या अक्षरात लिहिलेले आहे. 100 रुपये किंवा त्याहून अधिक मूल्याच्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र, रिझर्व्ह बँकेचा शिक्का, गॅरेंटी आणि प्रॉमिस क्लॉज, अशोक स्तंभ, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आणि दृष्टिहीन व्यक्तींसाठी ओळख चिन्ह छापलेले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *