Athiya Shetty KL Rahul Wedding: अथिया शेट्टी झाली मिसेस KL Rahul, रोमँटिक पोस्ट केली शेअर


Athiya Shetty Post After Wedding: टीम इंडियाचा क्रिकेट के एल राहुल (KL Rahul) आणि अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवाह सोहळा आज पार पडला. सुनिला शेट्टीच्या (Sunil Shetty) खंडाळा इथल्या बंगल्यात हा सोहळा पार पडला. या शाही विवाह सोहळ्याला (Royal Wedding) बॉलिवूड  आणि क्रिकेट क्षेत्राताली दिग्गज आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नानंतर अथिला शेट्टीने इंस्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल (Viral on Social Media) झाली आहे. या पोस्टबरोबर अथियाने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. (Athiya Shetty-KL Rahul Wedding Photo)

या फोटोमध्ये अथिया शेट्टी आणि के एल राहुल खुपच सुंदर आणि रोमँटिक दिसतायत. या फोटोबरोबर अथिया शेट्टीने एक पोस्टही लिहिली आहे. अथियाच्या या पोस्टवर बॉलिवूडपासून क्रिकेट क्षेत्रातील अनेकांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोसोबत लिहिलेली पोस्टही सर्वाचं लक्ष वेधून घेतेय, यात तीने म्हटलंय, तुझ्या सानिध्यात राहून मी प्रेम करायला शिकले, तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतोय की आम्ही दोघांनी लग्न केलं आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वादाने आमचे हृदय भरून आलं आहे. आमच्या नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद द्या, असं तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

आथियाच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव
ही पोस्ट अथियाने के एल राहुलला टॅग केली आहे. आथियाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. अभिनेता आयुष्यमान खुरानाने शुभेच्छा देत हार्ट आयकॉन शेअर केला आहे. याशिवाय विक्की कौशल, कार्तिक आर्यन, विराट कोहली, हुमा कुरेशी, नव्या नंदा, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, शिबानी दांडेकर, परिणीति चोपडा आणि वाणी कपूर यांच्याबरोबरच अनेक दिग्गजांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

खंडाळा इथल्या बंगल्यात विवाह सोहळा
सुनिल शेट्टी याच्या खंडाळा इथल्या बंगल्यात हा शाही विवाहसोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरु होती. लग्नानंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टीने मीडियासमोर फोटोशूटही केलं. राहुल आणि अथियाच्या लग्नाचे कपडे डिझायनर अनामिका खन्नाने डिझाईन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यात डिजेच्या तालावर नाचगाणं रंगणार आहे. 

सासरा नाही तर वडिल बनेन – सुनील शेट्टी
के एल राहुलचा मी सासरा नाही तर वडिल बनेन असं यावेळी सुनील शेट्टी याने सांगितलं. तसंत आयपीएलनंतर रिसेप्शन होईल असं ही सुनील शेट्टीने स्पष्ट केलं. लग्नात सुनील शेट्टीने पेस्टल पिंक रंगाचा कुर्ता परिधान केला होता. सुनील शेट्टीबरोबर त्याचा मुलगा अहान शेट्टीचाही फोटो समोर आला आहे.Source link

Leave a Reply