Headlines

कोणत्या काळात जगतोय आपण? अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं

[ad_1]

Amala Paul Denied Entry In Keralas Hindu Temple : अभिनेत्री अमला पॉल (Amala Paul) ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चित्रपटांमुळे ती वादाच्या भोवऱ्याच अडकते. यावेळी अमालाला सोमवारी केरळमधील एका हिंदू मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. यावरून अमला पॉल आरोप करत म्हणाली की, धार्मिक भेदभावामुळे तिला केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात प्रवेश करण्यापासून अधिकाऱ्यांनी रोखले होते. त्यांचे म्हणणे असे होते की तिनं प्रवेश केला तर सगळ्या प्रथांचे उल्लंघन होईल आणि त्यामुळे या मंदिरात फक्त हिंदूनाच प्रवेश मिळेल. 

याविषयी सांगत अमला पॉल म्हणाली की यामुळे तिला फक्त रस्त्यावरून मिळणारे देवीचे दर्शन घ्यावे लागले. अमलाने मंदिरातील व्हिजिटर्स रजिस्टरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी अमलानं लिहले की ‘हे दुःखद आणि निराशाजनक आहे की 2023 मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. मी देवीच्या जवळ जाऊ शकत नव्हते, पण लांबून दर्शन घेऊनही तिची अनुभूती येत होती. मला आशा आहे की धार्मिक भेदभावात लवकरच बदल होतील आणि अशी वेळ नक्कीच येईल, जेव्हा धर्माच्या आधारावर नव्हे तर आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

हेही वाचा : कॅमेरामॅनवर पुन्हा एकदा संतापल्या Jaya Bachchan, पत्नीचं ‘हे’ रुप पाहताच Amitabh यांची अनपेक्षित प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेनंतर ज्या ट्रस्टद्वारे मंदिराचा कारभार चालवला जातो त्या ट्रस्टच्या विरोधात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. न्यूज 18 मल्याळममधील वृत्तानुसार, मंदिर प्रशासनानं सांगितले की ते फक्त विद्यमान प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. ट्रस्टचे सचिव प्रसून कुमार म्हणाले, ‘अन्य अनेक धर्मातील भाविक मंदिरात दर्शनासाठी आले आहेत, परंतु हे कोणालाच माहीत नाही. मात्र, जेव्हा एखादी सेलिब्रिटी येते तेव्हा ते वादग्रस्त ठरते.”

चित्रपटांमध्ये काम करण्यावर काम म्हणाली होती अमला…

अमलाने वयाच्या 17 व्या वर्षी ‘नीलतमारा’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तिने तमिळ व्यतिरिक्त काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. अमलाने तेलुगूमध्ये रामचरण, अल्लू अर्जुन, नानी यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले पण तरीही तिने या इंडस्ट्रीला रामराम ठोकला. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलताना अमाला म्हणाली, “जेव्हा मी तेलुगू इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा मला वाटले की तिथे कौटुंबिक वातावरण असलेले चित्रपट बनवले जातील. पण चित्रपटांमध्ये 2 अशा अभिनेत्री राखून ठेवलेल्या असतात ज्या फक्त लव्ह सीन्स आणि गाण्यांवर डान्स करतात. हे लोक भरपूर कमर्शियल सिनेमा बनवतात आणि मी त्यात काम करू शकत नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *