Astrology Tips: एवढीशी सुपारी तुमचं भाग्य उजळेल; ‘हे’ उपाय केल्यास कधीच भासणार नाही पैशांची चणचण


Astrology Upay for money: सुपारी (betel nut) सर्व भारतीयांना परिचयाची आहे, सुपारीचा वापर हा खायच्या पानासोबत केला जातो असं नाही, अनेक धार्मिक पूजाविधींसाठीसुद्धा केला जातो.  हिंदू धर्मशास्त्रात (hinduism) कोणताही शुभ प्रसंग असेल तर, सुपारीला पाहिलं प्राधान्य दिल जात. विघ्नहर्ता, आधिदेवता श्री गणरायाला सुपारी अतिशय प्रिय आहे त्यामुळे गणपतीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा होतोच. (betel nut upay for good luck in business for money as per astrology know everything in marathi )

इतकंच काय तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेतसुद्धा सुपारी वापरलीच जाते.  तुम्हाला माहित आहे का ज्योतिष शास्त्रात (astrology tips for money) सांगितल्याप्रमाणे पूजेव्यतिरिक्त तुमच्या आयुष्याच्या उन्नतीमध्ये सुपारी खूप महत्वाचं काम करते.  पैसा, भविष्य, भरभराट हवी असेल तर सुपारीचे काही उपाय आहेत ते केले कि आपल्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडणार हे नक्की. 

 पैशांची चणचण

 पैशांची चणचण असेल तर,  पूजेत वापरणारी सुपारी कापडासोबत बांधून पूजा संपल्यानंतर घरातील तिजोरीत ठेवावी. असं केल्याने घरात सुख येते शिवाय संपत्तीमध्ये खूप वाढ होते. 

नोकरी धंद्यात यश मिळावं म्हणून

ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, नोकरी धंद्यात सतत अपयश येत असेल विशेष यश मिळत नसेल तर, शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा तिथे एक रुपयाचं नाणं ठेवा त्यावर एक सुपारी ठेवा. दुसऱ्या दिवशी तेच नाणं आणि सुपारी पिंपळाच्या पानात बांधून तिजोरीत ठेऊन द्या. असं केल्यास नोकरी धंद्यात हमखास यश मिळेल. 

कामात अडथळे येत असतील 

 बऱ्याचदा असं होत आपलं कुठलंही काम कोणतीही अडचण नसेल तरी पूर्ण होत नाही , काही ना काही अडचण येतच जाते आणि आपल्या कामात अडथळे निर्माण होतात. अश्यावेळी दोन लवंगा आणि एक सुपारी सतत तुमच्या पर्समध्ये राहूद्या. कोणतेही महत्वाचे काम करत असाल तेव्हा यातील लवंग खा आणि मग मंदिरात ती सुपारी अर्पण करा.  असं केल्यास तुमची काम सुरळीत पार पडतील इतकंच काय तर तुम्हाला त्या कामात यशसुद्धा मिळेल. 

घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी फायदेशीर 

घरात सतत क्लेश होत (astrology upay for family problem) असतील, घरातील सदस्य तणावात असतील त्यांचं एकमेकांशी पटत नसेल तर समजून जा की, घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे. घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला चांदीच्या भांड्यात सुपारी ठेवा, लक्षात असुद्या के सुपारी अशी ठेवायची आहे सूर्याची किरणे थेट सुपारीवर पडतील . असं केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाते.  

(सूचना : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर दिली आहे , अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही, झी २४ तास याची खातरजमा करत नाही. ) Source link

Leave a Reply