Headlines

Astro Tips: या 5 राशीच्या व्यक्तींसाठी मोती धारण करणं म्हणजे धोका ! वेळीच व्हा सावधान

[ad_1]

Astrology Tips :  मोती आपल्या हातात असावा असं अनेकांना वाटतं. मोती आणि चंद्राचा खूप जवळचा संबंध ज्योतिष शास्त्रामध्ये आहे. राशीतील चंद्र अथवा शनी कठोर असेल तर मोती हातात परिधान करण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. ज्यांना मानसिक त्रास किंवा चंद्र ग्रह ज्या राशींसाठी चांगला नाही अशा लोकांना मोती धारण करण्यास सांगितलं जातं. (ASTROLOGY TIPS FOR RASHI)

आजकाल मोती फॅशन म्हणून धारण करण्याचा एक ट्रेन्ड नवीन सुरू झाला आहे. जर तुम्ही मोती धारण केला असेल किंवा तसा विचार करत असाल तर थांबा. कारण ही माहिती कदाचित तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते. शास्त्रानुसार कोणत्या राशीच्या व्यक्तींनी मोती धारण करणं टाळावं आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली आहे. (this rashi dont wear pearl it will harmfull to you)

12 राशींपैकी अशा 5 राशी आहेत ज्यांनी मोती धारण करू नये. याचे आर्थिकच नाही तर आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. या 5 राशी नेमक्या कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेऊया.

वृषभ : शुक्र ग्रहाचे राज्य असतं त्यामुळे या राशीच्या लोकांनी मोती घालू नये. त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याच वेळी उधळपट्टी वाढू लागते. कुटुंबात वैमनस्य वाढू शकतं. 

मिथुन : मिथुनचा स्वामी बुध ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी मोती घालू नये. त्यामुळे आयुष्यात चढ-उतार येतात. आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. याशिवाय तणावामुळे आराम मिळत नाही.

सिंह : या राशीचा स्वामी सूर्य देव आहे.  या राशीच्या लोकांनी मोती घालू नये. मोती घालता तर त्यांना आर्थिक अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. 

धनु : या राशीच्या स्वामी बृहस्पती आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मोती धारण करू नये. अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय जीवनात अनेक वाईट समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. काही राशींसाठी मोती घालण्याचा सल्ला देतात मात्र ग्रहांच्या दिशा बदलल्याने हा बदल केला जाण्याची शक्यता असते. नाहीतर या राशीच्या व्यक्तींनी ज्योतिषांचा सल्ला न घेता मोती धारण करू नये. आरोग्याची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. 

(Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *