Astro Tips For Loan: ‘या’ दिवशी कर्ज घेणे पडेल महागात, फेडताना येतील नाकीनऊ


Astro Tips For Loan : सध्या अनेक कपंन्या बंद पडल्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसला आहे. कर्ज घेणे ही काळाची गरज झाली आहे. आजच्या काळात कर्ज ही एक मोठी समस्या आहे. हल्ली लोक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी सहज कर्ज घेतात इतकंच नाही तर गरजा पूर्ण करण्यासाठी देखील कर्ज घेतले जाते. पण त्यासाठी पैसे भरणेही मोठी समस्या आहे. कर्जात बुडालेली व्यक्ती नेहमी काळजीत असते त्या व्यक्तीला भविष्याचा आधी विचार करावा लागतो. त्यामुळे त्याला शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. कधी कधी कर्ज इतकं होतं की वर्षानुवर्षे लोक त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहतं. ज्योतिष शास्त्रानुसार ज्ञानी व नक्षत्र पाहून कर्ज घ्यावे. कारण त्यांचा प्रभाव आपल्यावर नक्कीच जाणवतो. जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज कधी घ्यावे आणि कधी नाही. (Astro Tips For Loan If you take a loan on this day it will be difficult to repay know what are days nz)

या दिवशी कर्ज घेऊ नका

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्ज घेण्यासाठी वेळ आणि तारीख निवडणे खूप महत्वाचे आहे. कारण चुकीच्या दिवशी कर्ज घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार, बुधवार, शनिवार या दिवशी कर्ज घेणे टाळावे. याशिवाय नक्षत्रांविषयी सांगायचे तर हस्त, मूल, आद्रा, ज्येष्ठ, विशाखा, कृतिका, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाद, उत्तराभाद्रपद, रोहिणी इत्यादी नक्षत्रांमध्ये कर्ज घेऊ नये.

कर्ज घेण्यासाठी कोणता दिवस आणि नक्षत्र शुभ 

ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला एखाद्याकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही ते सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी घेऊ शकता. या दिवसात घेतलेले कर्ज लवकर फेडता येते.

ज्योतिषशास्त्रानुसार स्वाती, पुनर्वसु, धनिष्ठा, शतभिषा, मृगाशिरा, रेवती, चित्रा, अनुराधा, अश्विनी आणि पुष्य इत्यादी नक्षत्रांमध्ये कर्ज घेणे फायदेशीर ठरेल. तुम्ही त्यांना लवकरच पैसे देऊ शकता.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)Source link

Leave a Reply