Astro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज


Vastu Tips For Roti : माणूस हा पोटासाठी जगतो. आपलं घर आणि आपलं कुटुंब कायम सुखी राहवं आणि आपल्या घरावर कायम लक्ष्मी मातेची कृपा राहावी. म्हणून प्रयत्न करत असतो. ज्योतिषशास्त्र (Astrology Tips) आणि वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्वयंपाक घरात बनणारी चपाती (Roti) याबद्दलही काही नियम आहेत. जर हे नियम तुम्ही पाळले नाही तर अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी नाराज होईल आणि तुमच्या घरावर संकट येईल. आज आपण चपातीच्या (chapati) नियमाबद्दल जाणून घेऊयात जर तुम्ही या चुका करत असाल तर वेळीच थांबा. 

ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे की या प्रसंगांमध्ये कधीही घरात चपाती बनवू नका. त्या दिवसांबद्दल जाणून घेऊयात. (roti rules vastu tips chapati on these 5 occasions)

या दिवशी चपाती बनवू नका. 

1. कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यू झाला असेल तर 

आपण घरात कायम प्रत्येकासाठी चपाती बनवतो. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार जर घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यादिवशी चपाती करु नये. तेराव्या विधीनंतर चपाती करावी असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर या नियमाचं पालन केलं नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, मृत व्यक्तीच्या सूक्ष्म शरीरावर फोड येतात. 

2. नागपंचमी

नागपंचमीच्या दिवशीही स्वयंपाकघरात चपाती बनवू नका, असं शास्त्रात लिहिलं आहे. या दिवशी फक्त खीर, पुरी आणि हलवा या गोष्टी खाव्यात. नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवण्यास मनाई आहे, असं सांगितलं आहे. लोखंडी जाळी ही सापाच्या फणीची प्रत मानली जाते. म्हणूनच नागपंचमीला तव्याला अग्नीवर ठेवू नये.  

3. शीतलाष्टमी

ज्योतिषशास्त्रानुसार शीतलाष्टमीला माता शीतला देवीची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी आईला शिळे अन्न अर्पण करावं असं मानलं जातं. मातेला अन्न अर्पण करण्यासोबतच शिळे अन्न खाल्ले जातं. या दिवशी सूर्योदयापूर्वी मातेला शिळे अन्न अर्पण केलें जातं आणि हा फक्त प्रसाद म्हणून स्वीकारला जातो.

4. शरद पौर्णिमा

शास्त्रानुसार शरद पौर्णिमेलाही चपाती बनवण्यास मनाई आहे. या दिवशी चंद्र 16 कलांमध्ये निपुण असतो. या दिवशी संध्याकाळी शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवून चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून ग्रहण केली जाते. चांदण्यात ठेवलेली खीर खाण्याच्या परंपरेमुळे त्या दिवशी घरी चपाती भाजली जात नाही. 

5. मातालक्ष्मीचे सण

शास्त्रात सांगितले आहे की, जे काही सण मां लक्ष्मीशी संबंधित आहेत, त्या दिवशी चपाती करू नये. यामध्ये प्रामुख्याने दिवाळीचा सण समाविष्ट आहे. या दिवशी फक्त सात्विक अन्न, पुरी, मिठाई इत्यादींचं सेवन केलं जातं. पण या दिवशी घरी चपाती करणे टाळावे.

ही हे नियम लक्षात ठेवा!

जास्त चपाती बनवा

वास्तुशास्त्रानुसार घरातील सदस्यांच्या संख्येपेक्षा 4-5 अधिक चपात्या नेहमी बनवल्या पाहिजेत. कारण पहिली रोटी गायीला खायला द्यावी आणि शेवटची रोटी कुत्र्याला खाऊ घालणे शुभ मानलं जातं. घरातील ज्येष्ठ मंडळी कायम म्हणतात मोजून चपाती करु नयेत. 

पाहुण्यांसाठीही चपाती ठेवा

वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना पाहुण्यांसाठी 2 चपात्या बनवल्या पाहिजेत. कारण घरी आलेला पाहुणा हा देवासारखा असतो. म्हणूनच घरी आलेल्या पाहुण्याला कधीही उपाशी पाठवू नये. म्हणूनच दोन चपत्या जास्त करा. जेणेकरून माँ अन्नपूर्णेचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहिल. जर कोणी पाहुणे आले नाही तर या चपात्या कुत्र्यांना, मांजरींना किंवा पक्ष्यांना खायला द्या.

या पीठाने चपाती बनवू नये

वास्तुशास्त्रानुसार पीठ मळल्यानंतर कधीही फ्रिज इत्यादीमध्ये ठेवू नये. कारण शिळ्या पिठापासून बनवलेल्या चपातीमुळे कुटुंबावर संकट येतं. यासोबतच अनेक प्रकारचे बॅक्टेरियाही निर्माण होतात. यासोबतच शिळी चपाती म्हणजे राहुशी संबंधित आहे. म्हणूनच तुम्ही कुत्र्याला शिळ्या पिठाची चपाती देऊ शकता. दुसरीकडे, ताजी चपाती ही मंगळ मजबूत करते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply