Headlines

Asia Cup 2023 : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान आता…., जय शहांनी केली घोषणा

[ad_1]

Asia Cup 2023 ind vs pak : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) या दोन्ही संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू झाली आहे. तर शेवटच्या महिन्यात आशिया चषक (Asia Cup 2023), एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023) यासारख्या स्पर्धा होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वीच भारत आणि पाकिस्तान या सामन्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह (Jai Shah) यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. या यादीत चाहत्यांची पहिली नजर पाकिस्तानात झालेल्या आशिया कप 2023 वर पडली. 

याबबात जय शाह यांनी ट्विट केले असून, सप्टेंबरमध्ये आशिया चषक (Asia Cup 2023) एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असतील. तर दुसरा गट गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आहे. मात्र आशिया चषक पाकिस्तानात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तान अधिकृतपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. परंतु BCCI सचिव असल्याने जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे की टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. आशिया चषक 2023 मध्ये लीग टप्पा, सुपर-4 आणि फायनल असे एकूण 13 सामने खेळवले जातील. 

वाचा : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पाहा फ्रीमध्ये, सामना कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या 

आशिया कप 2023 वर वाद

T20 विश्वचषक 2022 च्या आधी, जय शाह यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) स्पष्ट केले होते की, भारतीय संघ आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार नाही आणि स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवली जाईल. बीसीसीआय सचिवाच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली होती. पाकिस्तान बहुराष्ट्रीय स्पर्धेत प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणार असून स्पर्धेपूर्वीचे हे विधान यजमानांसाठी मोठा धक्का आहे. जय शाह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानकडून अशीही विधाने आली होती की, जर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर पाकिस्तान संघ 2023 च्या विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही.

2008 पासून भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला गेलेला नाही. 2008 च्या आशिया चषकासाठी भारतीय संघ शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. दोन्ही देशांमधील खराब राजकीय संबंधांमुळे अनेक दिवसांपासून द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक दरम्यान खेळवले जातात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *