Headlines

Asia Cup 2022 : ‘तो’ बाजूने गेला आणि अक्रम-इरफानने वाकून टाळ्या वाजवल्या, मयंती लँगरने सांगितले कोण होता ‘तो’

[ad_1]

Asia Cup 2022 : एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून रविवारी हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (India vs Pakistan) पराभव करत स्पर्धेत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. 

या सामन्यानंतर मैदानावर एक दृश्य पाहिला मिळालं, ज्यावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या. याची सोशल मीडियावरही (Social Media) चांगली चर्चा रंगली. भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर मैदानावर अँकर मयंती लँगर (mayanti langer), भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम (Vasim Akram) सामन्यावर विश्लेषण करत होते. 

अक्रम आणि इरफानने वाकून टाळ्या वाजवल्या
भारत-पाकिस्तान सामन्यावर चर्चा सुरु असतानाच एक मजेदार घटना घडली ज्याचा कोणी विचारही केला नसेल. मयंती लँगर भारत पाकिस्तान सामन्यावर इरफान पठाण आणि वसीम अक्रमला प्रश्न विचारत होती. त्याचवेळी दोघांची नजर बाजूने जाणाऱ्या खेळाडूवर पडली. त्याला पाहून दोघांनीही वाकून टाळ्या वाजवल्या. या घटनेनं प्रेक्षकही हैराण झाले. अखेर मयांती लँगरने तो खेळाडू नेमका कोण होता याचं उत्तर दिलं.

तो खेळाडू कोण?
इरफान पठाण आणि वसीम अक्रमने ज्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवल्या. त्या खेळाडूचं नावं आहे हार्दिक पांड्या (Hardik Pandya). पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात षटकार खेचत हार्दिक पांड्याने भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या संयमी कामगिरीचं कौतुक होतंय. 

हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख खेळाडू आहे. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर हार्दिक पांड्याने भारताला अनेक विजय मिळवून दिलेत. धोणीनंतर बेस्ट फिनिशर म्हणून हार्दिक पांड्याकडे पाहिलं जातंय. 

दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा हार्दिक पांड्या जबरदस्त फॉर्मात आहे. नव्या आत्मविश्वासाने तो संघात परतला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हाच आत्मविश्वास हार्दिक पांड्यामध्ये दिसला. बॉलिंगमध्येही हार्दिक पांड्याने भारतासाठी 3 विकेट घेतल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *