Asia Cup 2022 चं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला भिडणार IND vs PAK, वाचा सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर


Women’s T20 Asia Cup Full Schedule: पुरुष क्रिकेटसोबतच मागील काही वर्षात महिला क्रिकेटमध्येही अगदी चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळत आहे. जगभरातील महिला क्रिकेटर्सच्या (Indian Women Cricket) दमदार खेळामुळे सामनेही चुरशीचे होत आहेत. नुकताच पुरुषांचा आशिया कप 2022 पार पडल्यानंतर आता महिला आशिया कप 2022 (Women’s T20 Asia Cup) पार पडणार आहे. (womens t20 asia cup 2022 schedule india vs pakistan on 7 october bangladesh to host )

बांग्लादेशमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, युएई आणि थायलंड हे सात संघ सहभागी होणार आहेत. 

बांगलादेशमध्ये यावर्षी होणाऱ्या महिला T20 (Women’s T20 Asia Cup) आशिया कपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा 1 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. यादरम्यान भारताच्या महिला संघ आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे. 

7 ऑक्टोबरला भारत-पाक आमने-सामने

भारतीय महिला संघ 1 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला सुरुवात करेल. बांगलादेशातील सिल्हेट येथे होणाऱ्या या स्पर्धेत 7 ऑक्टोबर रोजी ‘हाय-व्होल्टेज’ सामना खेळवला जाईल. ज्यामध्ये भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे (IND vs PAK) महिला संघ आमनेसामने असतील. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

महिला संघाचे संपूर्ण वेळापत्रक

या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ 1 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध आपल्या सामन्याला सुरुवात करेल. यानंतर 3 ऑक्टोबरला त्याचा सामना मलेशियाशी तर 4 ऑक्टोबरला यूएईशी होणार आहे. त्यानंतर 7 आणि 8 ऑक्टोबरला सलग सामने होतील. भारतीय संघ 7 ऑक्टोबरला पाकिस्तानशी तर ८ ऑक्टोबरला यजमान बांगलादेशशी भिडणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी थायलंड विरुद्ध सामना होणार आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 11 आणि 13 ऑक्टोबरला आणि अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होईल.

वाचा : गाडीची टाकी फुल करायचा विचार करताय? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर 

ही टीम सहभागी होणार आहे

महिला आशिया चषक स्पर्धेचा हा आठवा हंगाम असेल. भारत, पाकिस्तान, यजमान बांगलादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती (UAE), थायलंड आणि मलेशिया हे सहभागी संघ आहेत. तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये महिला संघ नाही. 

महिला आशिया कप 2022 वेळापत्रक

दिनांक सामना ठिकाण वेळ
1 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
1 ऑक्टोबर भारत विरुद्ध श्रीलंका एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
2 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
2 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध युएई सआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
3 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश  एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
3 ऑक्टोबर भारत विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
4 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
4 ऑक्टोबर भारत विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
5 ऑक्टोबर युएई विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
6 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध थायलंड सीआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
6 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध मलेशिया सीआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
7 ऑक्टोबर थायलंड विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
7 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
8 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
8 ऑक्टोबर भारत विरुद्ध बांग्लादेश एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
9 ऑक्टोबर थायलंड विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
9 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
10 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
10 ऑक्टोबर भारत विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
11 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
11 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
13 ऑक्टोबर सेमीफायनल 1  एसआयसीएस ग्राऊंड 1  9 AM
13 ऑक्टोबर सेमीफायनल 2  एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
15 ऑक्टोबर फायनल  एसआयसीएस ग्राऊंड 1  1.30 PM

 Source link

Leave a Reply