Headlines

अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेस फुटीच्या चर्चांना उधाण, बाळासाहेब थोरात म्हणाले “ते सध्या…” | Balasaheb Thorat comment on speculations about Ashok Chavan Devendra Fadnavis meeting

[ad_1]

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अशोक चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चेनंतर काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचं बोललं गेलं. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्याबाबतचं वृत्त चुकीच्या आधारावर प्रसारित केल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त चुकीच्या आधारावर आहे. अशी कोणतीही परिस्थिती नाही. अशोक चव्हाण आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही एकत्र काम करत आहोत.

“त्या भेटीचा असा अर्थ लावणं योग्य नाही”

“अशोक चव्हाण सध्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रियपणे सहभागी होत आहेत. ते गणपती दर्शनाच्या निमित्ताने मित्राकडे गेले. तिथे दुसऱ्या नेत्यांची भेट झाली. म्हणून त्याचा असा अर्थ लावणं योग्य नाही. अशोक चव्हाण आणि आम्ही काँग्रेसची बांधणी करण्यासाठी काम करत आहोत आणि काम करत राहू,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेस फुटीच्या चर्चांना उधाण, बाळासाहेब थोरात म्हणाले “ते सध्या…”

अशोक चव्हाणांसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी माझी कुठलीही भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहचलो आणि तेही पोहचले. ते दर्शन घेऊन निघाले तेवढ्यात मी पाहचलो. असं तर सगळ्यांचं होतं. मात्र, माझी आणि त्यांची कुठलीही भेट होत नाही.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *